राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंनेश्वर देशमुख यांचा कार्यकर्त्यांसाहित काँग्रेस मध्ये प्रवेश.
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी:- जि. प. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरमाडी/तुप प. स. मधून निवडणूक लढविलेले उमेदवार मुंनेश्वर भिवा देशमुख यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दि.6 जानेवारीला काँग्रेस मध्ये आपल्या कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी ला ऐन निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसला आहे आज सायंकाळी भंडारा जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष ऍड. शफी लद्धानी यांच्या घरी हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी लाखनी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजु निर्वाण, मुरमाडी/तुप जि. प. क्षेत्राचे काँग्रेसचे उमेदवार आकाश कोरे, माजी पंचायत समिती सभापती सदाराम देशमुख, मुरमाडी/तुप पंचायत समिती गणाची काँग्रेस कडून निवडणूक लढविलेले उमेदवार ताराचंद निरगुडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मुंनेश्वर देशमुख यांच्या सह नान्होरी येथील जवळपास 30 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ला रामराम ठोकत काँग्रेस मध्ये प्रवेश केला. सोबतच मेंढानगर येथील माजी सरपंच शालू चौबे यांनी सुद्धा काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश केला. रामपुरी व मुरमाडी/तुप येथील10 ते15 कार्यकर्त्यांनी सोबतच काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. मुरमाडी/तुप जि. प. क्षेत्र सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. या क्षेत्रातून 14 उमेदवारानी नामांकन दाखल केले आहे. त्यामुळे या क्षेत्रात निवडणुकीची चांगलीच रणधुमाळी होणार आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे काँग्रेसच्या तंबूत दाखल होणे हे राष्ट्रवादी ला धक्का देणारे तर काँग्रेसचे जि. प. चे उमेदवार आकाश कोरे यांना निवडणुकीत बळ देणारा पक्षप्रवेश ठरला आहे.