cctv-systems-for-police-in-mumbai-city
संकल्प सिद्धी ट्रस्टच्या दिव्या ढोले यांनी वर्सोवा व ओशिवरा पोलीस स्थानकाला दिली CCTV यंत्रणेची भेट, परिसरातील गुन्हेगारांवर बसणार वचक.
cctv-systems-for-police-in-mumbai-city
संकल्प सिद्धी ट्रस्टच्या दिव्या ढोले यांनी वर्सोवा व ओशिवरा पोलीस स्थानकाला दिली CCTV यंत्रणेची भेट, परिसरातील गुन्हेगारांवर बसणार वचक.

सिद्धांत
७ जानेवारी २०२१: संकल्प सिद्धी ट्रस्ट, मुंबई” या संस्थेच्या कार्यकारी अध्यक्ष आणि भाजप महाराष्ट्र सचिव श्रीमती दिव्या ढोले यांच्याकडून मुंबई पोलीस परिमंडळ ९ क्षेत्रातील वर्सोवा व ओशिवरा पोलीसस्थानकांअंतर्गत अति संवेदनशील ठिकाणांवर लावण्यासाठी “सीसीटीव्ही कॅमेरे व सर्व्हेलिअन्स यंत्रणा” आणि प्रदान करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे परिसरातील गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी आणि तपासगती वाढवण्यासाठी पोलिसांना मदत होणार आहे.

६ जानेवारीला श्रीमती दिव्या ढोले यांच्याकडून सर्व्हेलिअन्स यंत्रणेचे अधिकृत हस्तांतरण मुंबई पोलीस परिमंडळ ९ चे उप आयुक्त “श्री मंजुनाथ शिंगे” यांच्याकडे प्रकल्प दस्तावेज देत ओशिवरा पोलीस स्थानक येथे करण्यात आले.

संकल्प सिद्धी ट्रस्ट, मुंबई

“आपला परिसर आपली जवाबदारी” ह्या प्रकल्पाअंतर्गत संकल्प सिद्धी ट्रस्ट मुंबई ही संस्था “सार्वजनिक सुरक्षितता आणि सुरक्षा” ह्या विषयाला अनुसरून शहरात सातत्याने अनेक उपक्रम राबवत असते. मुंबई शहरात २०१७-१८  मध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अति संवेदनशील ठिकाणांवर साधारण ५००० सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. पण मुंबई शहराची वाढत जाणारी लोकसंख्या आणि आकार पाहता, शहरामध्ये अजून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज असल्याचे दिसून येत होते. दाटीवाटीची ठिकाणे किंवा शहरातील काही सुनसान भागांमध्ये सर्वच ठिकाणी शासकीय सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्याने आजूबाजूच्या इमारती आणि दुकानांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील फुटेजचा वापर पोलिसांना करावा लागतो. काही वेळा असे फुटेज मिळविण्यात अनेक अडचणी येतात आणि त्यामुळे पोलिसांच्या तपासकार्यामध्ये अनेक अडथळे उद्भवतात. अश्या ठिकाणी स्वतंत्र सीसीटीव्ही कॅमेरे व सर्व्हेलिअन्स यंत्रणाची पोलिसांना असलेली गरज संकल्प सिद्धी ट्रस्टने जाणली.

त्यानंतर  वर्सोवा आणि ओशिवरा पोलीस स्थानकांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक व दहशतवादी विरोधी पथकाच्या  अधिकाऱ्यांशी चर्चा करून अति संवेदनशील ठिकाणांची यादी करण्यात आली. त्यांना आवश्यक असलेल्या अतिसंवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि सर्व्हेलिअन्स यंत्रणा संकल्प सिद्धी ट्रस्टच्या दिव्या ढोले यांच्यामार्फत बसवून देण्यात आली. गेला महिनाभर ह्या यंत्रणेच्या कामाच्या मॉनिटरिंगची प्रक्रिया चालू होती. यंत्रणेचे काम अगदी सुरळीत होत असल्याची खात्री झाल्यावर काल हि यंत्रणा वर्सोवा आणि ओशिवरा पोलीस स्थानकांकडे हस्तांतरित करण्यात आली. 

पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करताना संकल्प सिद्धी ट्रस्ट, मुंबई” या संस्थेच्या कार्यकारी अध्यक्ष श्रीमती दिव्या ढोले

यावेळी  एसीपी श्री सुनील बोंडे, वर्सोवा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सिराज इनामदार , ओशिवरा पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती रजनी साळुंखे ,दोन्ही पोलीस स्थानकाचे दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी, वर्सोवा क्षेत्रात सामाजिक काम करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ श्री प्रकाश गिडवाणी जी, भारत शर्मा जी उपस्थित होते.

यंत्रणेमुळे परिसरातील गुन्हेगारांवर बसला वचक 

या परिसरातील दहशतवादी विरोधी पथकांच्या अधिकाऱ्यांच्या दिलेल्या माहितीनुसार, ह्या यंत्रणेमुळे पोलिसांना तपासकार्यामध्ये मोठी मदत मिळत आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेराच्या धाकामुळे परिसरातील गुन्ह्यांचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून येत आहे. स्थानिक पातळीवरील समाजाच्या आणि पोलिसांच्या समस्या ओळखून संकल्प सिद्धी ट्रस्टच्या दिव्या ढोले यांनी वर्सोवा व ओशिवरा पोलीस स्थानकाला केलेल्या या सहकार्याचा प्रकल्प खूपच कौतुकास्पद आहे.

मुंबई पोलीस परिमंडळ ९ चे उप आयुक्त श्री मंजुनाथ शिंगे यांनी या प्रक्लपाबाबत माहिती देत श्रीमती दिव्या ढोले यांचे आभार व्यक्त केले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here