स्पॉटलाईट: अवकाळी पाऊस आणि वनप्राण्यांचा हैदोस..!
सौ.संगीता संतोष ठलाल
मु.कुरखेडा जि.गडचिरोली
मो: ७८२१८१६४८५
माणसाचं जीवन म्हटलं तर नुसतं सुखातच जीवन जातो असे अजिबात नाही. प्रत्येकांच्या दैनदिन जीवनामध्ये जढ, उतार,सुख, दु:ख,अडीअडचणी हे सर्व येतच असतात. काहींच्या जीवनात आनंद असतो तर काही लोक उपाशी पोटी निजत असतात. तर काहींच्या जीवनात सर्व काही असुन सुद्धा समाधान नसतो हे, वास्तव सत्य आहे. पण, ह्याच पृथ्वीतलावर असा एक महापुरुष आहे की,त्याच्या जीवनात सुख कमी पण दु:खच मात्र जास्त असतात तो, महापुरुष म्हणजेच जगाचा “पोशिंदा” बळीराजा होय.
त्याच्या जीवनात सुखाचे, समृद्धीचे दिवस कमी येत असतात पण, अनेक संकटे मात्र साथ सोडत नाही. तरीही तो जीवन जगण्यासाठी व इतरांना जगविण्यासाठी सदैव प्रयत्न करत असतो. पण, जेव्हा त्याच्यावर संकटे येतात तेव्हा मात्र पाहिजे त्या प्रमाणात कोणीही त्याची दखल घेत नाही. त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी वेळेवर कोणीही धावुन येत नाही. उलट त्यालाच उलटे, सुलटे बोलून मोकळे होऊन जातात मग त्या, बळीराजाने खरच कोणाकडे मदत मागावी. .? आजच्या घडिला बघितले तर त्याच्यावर निसर्गही कोपला आहे, आणि शासनही पुरेपूर लक्ष देत नाही. आज त्याच्या शेतामध्ये अनेक प्रकारचे पीक बहरून आलेले आहेत, काही पीक हिरवेगार दिसत आहेत पण, जेव्हा काही त्याच्या सोबत चांगले व्हायचे असते त्यावेळी मात्र निसर्ग संधी सोडत नाही. ह्या अवकाळी पावसामुळे व ढगाळलेल्या वातावरणामुळे त्या बहरून आलेल्या पीकांची आज नासाडी होत आहे. एवढेच नाही तर..आजकाल वनप्राण्यांनी सुद्धा गावाकडे धाव घेतलेली दिसून येत आहे.
एवढेच नाही तर त्यांनी आपला मोर्चा शेतपिकांकडे वळवला आहे. फार जास्त प्रमाणात पिकांची नासाडी करत आहेत हे, कोणापासूनही लपलेले नाहीत. गेल्या काही दिवसांच्या आधी हत्तीचे कडप शेतामध्ये घुसून कोणाचा धान जमा केलेल्या ढिगाला (पुंजन्याला) मातीमोल करून टाकले आहेत. पाच पोते बरोबर कोणाला धानही झाले नाही, गावात घुसून अनेकांच्या घराची नासधूस केलेली आहे हे,सत्य आहे.त्याच प्रमाणे आठवड्यातून एकदा तरी नेहमीच वाघांविषयीच्या बातम्या वृतपत्रात वाचन्यात येत असतात.कित्येक शेतकऱ्यांची,गरीब लोकांची, गुराख्याची,, त्यांच्या पाळीव प्राण्यांंची नरभक्षक वाघाने शिकार केली आहे.
आजच्या परिस्थिती माणसाच्या जीवनाचे मोलच दिसत नाही त्यांना कोणी मारो अथवा शिकार करो याकडे कोणीही काळजीपूर्वक लक्ष देत नाही. अशीच अवस्था आज जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाची झालेली आहे. बळीराजा आपले पीक शेतामध्ये बघायला जातो तर..वाघाचा शिकार होतो हे कोणी थांबवावे…? बळीराजा जर घरातच बसून राहिला तर..त्याला व त्याच्या कुटुंबाला कोण पोसणार आहे…? आणि जर..कोणी मदतही करत असेल तरी त्याच्या जीवनाची व कष्टाची किंमत मोजू शकत नाही. कारण बळीराजा हा सर्वात श्रेष्ठ आहे. पण,ह्या घोर कलियुगात त्याची कोणीही कदर करत नाही.
आज तो, निरपराध असताना सुद्धा वाघाचा शिकार होत आहे , त्याचे गाय, बैल, शेळ्या शिकार होत आहेत, निसर्गही संधी साधून कोपतो आहे मग त्याने कसे जीवन जगावे. .? त्याने कोणाची मदत मागावी. .? त्याच्या हातात पैसा नाही, शेतात पीक असून सुद्धा हाती येईल याची ग्यारंटी नाही,मुलांचे शिक्षण पैशाविना अडून बसतात, मुलगी लग्नाची झालेली आहे .सर्व हे,बळीराजाला करायचे आहे पण, त्याने काय करावे..? दरवर्षीच्या नापिकीमुळे आणि अनेक अडचणींमुळे तो, जीवन जगणे सोडून द्यायला बघतो आहे. पाहिजे त्या प्रकारे त्याच्या मालालाही भाव मिळत नाही. अशा अनेक संकटामुळे तो,स्वतःच तर..जग सोडून जातोच पण, त्याचा कुटुंब ही रस्त्यावर आलेला दिसून येत आहे. अशी अवस्था आज बळीराजाची झालेली आहे.
समाजात असणारे काही लोक अशा प्रसंगी पाठही फिरवताना दिसत असतात . म्हणून शासनाने पाठ फिरवायची का..? इतरांपाशी तर..सर्व काही असते तरीही आज त्यांच्या मागण्या पूर्ण होतात मग बळी राज्याच्या मागण्या का म्हणून पूर्ण होत नाही. .? शोकांतिका या गोष्टीची वाटते की, महापुरुष असलेल्या जगाचा पोशिंदा , बळीराजाला आपले पीक वाचविण्यासाठी, पाण्यासाठी रात्रंदिवस धडपड करावी लागते, हे कोणालाही दिसत नाही. वीजेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे. तरीही त्याच्या आंदोलनाकडे लक्ष दिल्या जात नाही. पण, का म्हणून. .? त्याने का म्हणून आंदोलन करावे…? अशी वेळ का म्हणून फक्त, त्याच्यावर येते…? याला जबाबदार कोण. ..? असे, अनेक प्रश्न,आहेत, आर्त हाक बळीराजाची आहे. ऐकून डोळ्यात अश्रू मावत नाही.
वास्तविक पहाता बळीराजासाठी चोवीस तास वीज पुरवठा चालू करायला पाहिजे. पण ते होत नाही यामुळेच त्याला नाईलाजाने वेळोवेळी आंदोलन करावे लागते. निदान त्यांची महानता जाणून, देशासाठी योगदान जाणून, त्याचे कष्ट, अडचणी जाणून शासनाने पुरेपूर त्याला मदत करायला पाहिजे, वनप्राण्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, समाजाने सुध्दा समजून घेतले पाहिजे, जर..असे नाही झाले तर..एक दिवस असा येईल की, हातात पैसे असून सुद्धा दोन घास अन्न मिळने कठीण होऊन जाईल कारण जीवन जगण्यासाठी जेवढी गरज पैशाची पडत असते त्यापेक्षा जास्त गरज अन्नाची पडत असते. म्हणून बळीराजाला वाचविण्यासाठी सर्वांनी मदत केली पाहिजे