कोल्हारे ग्रामपंचायत प्रशासना विरोधात कर्जत पंचायत समिती समोर उपोषण सुरू, मुख्यमंत्री कर्जत भेटीवर

57

कोल्हारे ग्रामपंचायत प्रशासना विरोधात कर्जत पंचायत समिती समोर उपोषण सुरू, मुख्यमंत्री कर्जत भेटीवर

 

संदेश साळुंके

नेरळ रायगड प्रतिनिधी

मो: 901119933

कर्जत: कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत मधील धामोते गावातील स्थानिक ग्रामस्थांचा रस्ता अडविण्यात आला आहे.तो रस्ता अडविनाऱ्या व्यक्तीला कोल्हारे ग्रामपंचायत प्रशासन मदत करीत असल्याने संबंधित ग्रामपंचायत मधील विद्यमान सदस्य यांचे सदयत्व रद्द करण्यात यावे आणि गावठाण क्षेत्रातील रस्ता खुला करण्यात यावा या मागणीसाठी आज 7 जानेवारी पासून कर्जत पंचायत समिती कार्यालया समोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान,राज्याचे मुख्यमंत्री हे कर्जत येथे येत असताना मुख्यमंत्र्यांच्या मार्गावर हे उपोषण सुरू असल्याने प्रशासनापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

                 कोल्हारे ग्रामपंचायत मधील धामोते गावातील संजय गजानन विरले यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे.त्यामुळे संजय विरले यांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. तेथील ग्रामपंचायतचे गावठाण जमिनीची जागेची खरेदी-विक्री करण्यात आली असून त्यांचे दस्त सह निबंधक कार्यालयात नोंदविण्यात आले आहे.त्यामुळे ते अनधिकृत बांधकाम उभारण्यास सहायक निबंधक कार्यालय देखील जबाबदार आहे.दुसरीकडे जमिनीची बेकायदा विक्री करण्यासाठी कोल्हारे ग्रामपंचायत कडून ना हरकत दाखला देण्यात आला. त्यांनतर संजय विरले यांच्या घराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. रस्ता खुला व्हावा यासाठी संजय विरले हे गेली दोन ते तीन वर्षापासून लढा देत आहे.परंतू प्रशासनाकडून आजतागयत दखल घेण्यात आलेली नाही.त्यांनी केलेल्या पत्र व्यवहाराला केराची टोपली दाखवली जात आहे.त्यात ग्रामपंचायत गावठाण जागेची खरेदी विक्री व त्यावर अनाधिकृत बांधकाम करणे नियमबाहय असून बेकायदेशीर कृत्य आहे. 

                       यामध्ये दोषी पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यावर कायेदेशीर कारवाई व्हावी. तसेच दोषी सरपंच व उपसरपंच यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी संजय गजानन विरले आणि सुनील गजानन विरले यांनी कर्जत पंचायत समिती कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे.आज सात जानेवारी रोजी कर्जत येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्जत येथे येत असून त्यांच्या प्रवासाच्या मार्गावर हे उपोषण सुरू झाल्याने प्रशासनासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.