बाबासाहेब पुतळ्याच्या प्रथम अनावरण वर्धापनदिनानिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम
• 26 जानेवारी रोजी राजरत्न आंबेडकर यांचे घुग्घुस नगरीत आगमन
*🖋️ साहिल सैय्यद*
📱 9307948197
घुग्घूस : 7 जानेवारी
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुंदर असे स्मारक घुग्घूस शहराच्या दर्शनी भागात निर्माण करण्यात आलेले आहे
या स्मारकात अष्टधातूंनी निर्माण करण्यात आलेली नऊ फूट उंच पायथ्यासह तेवीस फूट उंचीचा सुबक व लक्षवेधक प्रेरणादायी पुतळा 26 जानेवारी 2023 रोजी भव्य अश्या कार्यक्रमात बसविण्यात आला होता.
येत्या 26 जानेवारी रोजी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाची जय्यत तैयारी सुरु असून या कार्यक्रमाकरिता शहरात बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज राजरत्न आंबेडकर उपस्थित होणार आहेत.
या कार्यक्रमासाठी घुग्घुस शहर सज्ज होत आहे.