ममता दिन निमित्ताने वृद्धाश्रमात साहित्य वाटप.

ममता दिन निमित्ताने वृद्धाश्रमात साहित्य वाटप.

ममता दिन निमित्ताने वृद्धाश्रमात साहित्य वाटप.

ममता दिन निमित्ताने वृद्धाश्रमात साहित्य वाटप.

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्‍नी दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अलिबाग श्री समर्थ वृद्धाश्रम परहुर पाडा येथे ममता दिन साजरा करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा महिला संपर्क प्रमुख सौ. किशोरी पेडणेकर तसेच अलिबाग तालुका संपर्क संघटिका सौ. चंदना साळुंके व सौ. दिक्षा गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे आणि श्रीम. दिपश्री पोटफोडे यांच्या उपस्थितीत श्री समर्थ वृद्धाश्रम परहुर पाडा येथे ममता दिन साजरा करण्यात आला.

ममता दिन निमित्त वृद्धाना लागणाऱ्या रोजच्या छोट्या वस्तू, खाऊ, किराणा सामान भेट देण्यात आले. या कार्यक्रमासाठी विधानसभा संघटक कृष्णा कडवे व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन अलिबाग तालुका संघटिका सौ. स्नेहल देवळेकर यांनी केले. तालुका अधिकारी सौ. दर्शना वाकडे, विभाग संघटिका श्रीम. शिल्पा ठाकूर, सौ.निवेदिता गावंड, सौ. प्रणाली राऊत, सौ.पूनम नाईक, विभाग प्रमुख गिरीश शेळके यांनी सहकार्य केले.