Nagpur Devendra Fadnavis's allegation of molestation against loyal BJP leader Munna Yadav
Nagpur Devendra Fadnavis's allegation of molestation against loyal BJP leader Munna Yadav

नागपूर देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासू भाजप नेता मुन्ना यादववर विनयभंगाचा गुन्हा.

 Nagpur Devendra Fadnavis's allegation of molestation against loyal BJP leader Munna Yadav

नागपूर:- भारतीय जनता पक्षाचा नेता आणि राज्य कामगार विकास महामंडळाचा माजी अध्यक्ष मुन्ना यादव याच्याविरोधात शहर पोलिसांनी महिलेची गुंडगिरी आणि विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुन्ना यादव हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासू आहे. मालमत्ता वादाशी संबंधित असलेल्या प्रकरणामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल केल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. राजेंद्र यादव, गणेश यादव आणि प्रमोद डोंगरे अशी मुन्ना यादव व्यतिरिक्त आरोपींची नावं आहेत. प्रमोद डोंगरे हा जमीन विक्रेता असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी एक 40 वर्षाची महिला असून ती प्रताप नगर पोलीस स्टेशन परिसरात राहते. या महिलेने प्रमोद डोंगरेसोबत जयताला इथल्या पांडुरंग नगर इथं 12 लाखाचा एक घरगुती करार केला होता. इतकंच नाही तर 6 ते 12 डिसेंबर 2020 पर्यंत तक्रारदार आणि जमीन मालकाशी आपसात घरगुती करारावरून चर्चा होती. आरोपीने महिलेने 6 लाख रुपये दिल्याचंही सांगण्यात येत आहे.

हे घर सीनू होरो या व्यक्तीचं असून तो झारखंडचा आहे. त्याने डोंगरे या व्यावसायिकाला घर विकत घेण्याचा अधिकार दिला होता. पण डोंगरे याने महिलेचं नाव नोंदवलंच नाही. त्यामुळे वाद पेटला की डोंगरे याने हे घर राजवीर यादव याला विकलं. राजवीर यादव मुन्ना यादवचा जवळचा आहेत.

यावेळी मुन्ना यादवने संबंधित महिलेला अजनी चौकातील संपर्क कार्यालयात बोलावून घेत राजवीरशी वाद घालू नका असं सांगितल्या आरोप केला जात आहे. 2 जानेवारी 2021 ची घटना आहे. मुन्ना यादवने तिला धमकावल्याचंही सांगण्यात येत आहे. तिला जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली होती.

मुन्ना यादव नेहमीच असतो वादाच्या भोवऱ्यात

मुन्ना यादव अनेकदा जमिनीच्या वादात असतो. त्यांच्या पत्नी नगरसेविका होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तो निकटवर्तीय म्हणून त्यांची पदोन्नती झाली आहे. विधानसभेच्या दोन्ही सभागृहात यादवचे वाद मोठे चर्चेत आले होते. त्यामुळे आता या प्रकरणावरून पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here