पालघर प्रियकराने प्रेयसीची हत्या करुन, मृतदेह पुरला भिंतीत.

57

पालघर प्रियकराने प्रेयसीची हत्या करुन, मृतदेह पुरला भिंतीत.

प्रियकराने प्रेयसीची हत्या करुन मृतदेह भिंतीत गाडून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

 Palghar lover killed his girlfriend and buried her body in the wall.

राकेश जाधव प्रतिनिधी

मुंबई:- महाराष्ट्रातील पालघर मधील वृंदावन दर्शन कॉम्पेक्स मध्ये हैराण करणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची कथित रुपात हत्या करत मृतदेह भिंतीत पुरल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लोक थक्कच झाले आहेत. असे सांगितले जात आहे की, वृंदावन दर्शन कॉम्पेक्सच्या फ्लॅट क्रमांक 101 मध्ये सूरज हरमलकर आणि त्याची पार्टनर अमिता मोहिते राहत होते.

शेजाऱ्यांनी असे म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून फक्त सूरज दिसत होता. अमिता त्यांना दिसलीच नव्हती. पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, सुरजच्या फ्लॅटवर त्यांच्यासह रुग्णवाहिका, पोलिसांचे फोटोग्राफर आणि फॉरेंसिक एक्सपर्ट्स सुद्धा होते. त्याचसोबत पोलिसांनी काही मजुरांना सुद्धा आपल्यासोबत आणले होते.

फ्लॅटच्या बाहेर गर्दी आणि पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सुरज याला पाहून लोकांच्या मनात विविध प्रश्न उपस्थितीत राहत होते. पण पोलिसांनी फ्लॅटच्या भिंतीची जेव्हा तोडफोड करत मृतदेह बाहेर काढला त्यावेळी सर्व चित्र स्पष्ट झाले. पोलिसांनी 32 वर्षीय अमिता हिचा मृतदेह भिंतीतून बाहेर काढला होता. तिचा मृतदेह सडला होता. त्यामुळे तो शवविच्छेदनासाठी पोलिसांनी पाठवून दिला. चौकशीसाठी सुरज याला ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, असे बोलले जात आहे की या प्रकरणात सुरज याचाच हात असणार आहे. परंतु तपासानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होणार आहे. अमिता हिची हत्या नेमकी कोणी आणि का केली याचा सुद्धा पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. ऐवढेच नाही जर सुरज याने अमिताची हत्या केली तर तो तिच्या मृतदेहासोबतच घरात राहत होता का हा सुद्धा प्रश्न लोकांना पडत आहे.