‘शिवसेना जोमात अन भाजप कोमात’ ; भाजपचा ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

47

‘शिवसेना जोमात अन भाजप कोमात’ ; भाजपचा ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

माजी आमदार आणि भाजपचे नेते हेमेंद्र मेहता यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेते प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेहता यांनी शिवबंधन बांधलंय.

माजी आमदार भाजपचे नेते हेमेंद्र मेहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधलंय.

अशोक शाही प्रतिनिधी

मुंबई :- महापालिका निवडणुकीचं वारं वाहत असताना आता शिवसेनेनं भाजपला अजून एक झटका दिला आहे. माजी आमदार आणि भाजपचे नेते हेमेंद्र मेहता यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेते प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेहता यांनी शिवबंधन बांधलंय. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शुक्रवारी माजी आमदार आणि भाजप नेते कृष्णा हेगडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे सलग दोन दिवसांत शिवसेनेनं भाजपला दुसरा मोठा झटका दिल्याचं पाहायला मिळत आहे.

सध्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. पक्षनेतृत्वावर नाराज असणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी काल भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आज सायंकाळी भाजपाचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांचा भाजपाला रामराम ठोकला. भारतीय जनता पार्टीला बोरीवलीत खिंडार पडले असून मेहता यांच्या प्रवेशाने शिवसेनेला बोरीवलीत अधिक मजबूती येईल अशी चर्चा आहे.

हेमेंद्र मेहता हे बोरिवली पश्चिममधून ३ वेळा आमदार होते. पण भाजपकडून गोपाळ शेट्टी यांना विधानसभेला तिकीट देण्यात आलं. त्यावेळी हेमेंद्र मेहता यांनी बंडखोरी केली होती. पुढे मेहता यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा एकदा ते भाजपवासी झाले आणि आज अखेर त्यांनी पुन्हा एकदा भाजपला रामराम ठोकत शिवबंधन हाती बांधलं आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळापासून मुंबईमध्ये भाजपा पक्ष वाढीसाठी झटणारे, सध्याच्या भाजपाच्या नेतृत्वावर नाराज असणारे हेमेन्द्र मेहता यांची पक्षात घुसमट होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, आमदार व विभागप्रमुख विलास पोतनीस, युवासेना सचिव वरूण सरदेसाई हे देखील उपस्थित होते.