The 35-year-old became the first caste-free person in the country, regardless of caste or religion.
The 35-year-old became the first caste-free person in the country, regardless of caste or religion.

35 वर्षीय तरुणीला ना जात ना धर्म, देशातील पहिल्या जात-धर्ममुक्त व्यक्ती झाल्या. 

The 35-year-old became the first caste-free person in the country, regardless of caste or religion.
The 35-year-old became the first caste-free person in the country, regardless of caste or religion.

चेन्नई:- आज देशात जात आणी धर्माचा नावावर लोक रक्त सांडवायला तयार आहे. राजकारणी पण जातीची आणी धर्मीतेची मोट बांधून आपल राजकारण करत असल्याचे सर्वत्र चित्र दिसून येत आहे. मात्र तमिळनाडू मधिल एम. ए. स्नेहा यांनी जात धर्म नाकारुन माणुसकीचे उदाहरणं दिले आहे. आजच्या आधुनिक काळातही लोकांना जात-धर्म नेहमीच महत्त्वाचा वाटतो. गुणवत्तेपेक्षाही जाती-धर्माला लोक प्राधान्य देताना दिसतात. मात्र या मानवी प्रवृत्तीला छेद देणारं एक उदाहरण समोर आलं आहे.

तामिळनाडूमधल्या 35 वर्षीय एम. ए. स्नेहा जात आणि धर्माचा पूर्णतः त्याग केला आहे. आता देशातील पहिल्या जात-धर्ममुक्त व्यक्ती झाल्या आहेत. स्नेहा या व्यवसायानं वकील आहेत. त्यांनी जन्मदाखल्यावरील जात आणि धर्माचे कॉलम रिकामे सोडलेले आहेत. त्यांच्या या मुक्ततेवर सरकारनेही शिक्कामोर्तब केलं आहे. तामिळनाडू सरकारनं स्नेहा यांना एक प्रमाणपत्र दिलं आहे. यात म्हटलं आहे, की स्नेहा या जात आणि धर्मापासून पूर्णतः मुक्त आहेत. अशाप्रकारे सरकारने जात-धर्म मुक्त म्हणून जाहीर केलेल्या त्या देशातल्या पहिल्या व्यक्ती आहेत.

याबाबत स्नेहा म्हणाल्या, की सरकार जात प्रमाणपत्र प्रत्येकाला देतं. मला वाटलं, की आपल्याला सरकार जात-धर्मापासून मुक्त असल्याचं प्रमाणपत्र का देऊ शकणार नाही? त्यानुसार मी अर्ज केला आणि सरकारनंही तसं प्रमाणपत्र दिलं. विशेष म्हणजे माझं कुटुंबही आता या ओळखीतून मुक्त झालं आहे.’ स्नेहा यांच्या कुटुंबात आई-वडील, बहिणी आणि मुलींचा समावेश आहे. स्नेहा यांनी आपल्या मुलींची नावंही धार्मिक वैविध्य दाखवणारी ठेवली आहेत. अधिराई नसरीन, आदिला इरने आणि आरिफा जेस्सी अशी ही नावं आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here