हिंद महासागराच्या किनारपट्टीवरील देशांना मदत करण्यासाठी भारत सरकारने पुढाकार घेऊन सुरू केला ‘मिशन सागर’ उपक्रम

मीडिया वार्ता न्युज
८ फेब्रुवारी, मुंबई: कोविड-19 महामारीच्या काळामध्ये हिंद महासागराच्या किनारपट्टीवरील देशांना मदत करण्यासाठी भारत सरकारने पुढाकार घेऊन ‘मिशन सागर’ उपक्रम सुरू केला. या मिशनमध्ये भारतीय नौदलाने मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या 15 देशांमध्ये जहाजे तैनात केली. 215 पेक्षाही जास्त दिवस मिशन सागर उपक्रम चालवून यामध्ये मित्र देशांना 3000 मेट्रिक टन अन्नधान्याची मदत पुरविण्यात आली.
तसेच 300 मेट्रिक टनांपेक्षाही जास्त द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन, 900 ऑक्सिजन काँन्सट्रेटर्स, आणि 20 आयएसओ कंटेनर्स यांची मदत पुरविण्यात आली. या मिशनमध्ये भारतीय नौदलाच्या जहाजांनी जवळपास 40,000 सागरी मैल (एनएम) एकत्रित अंतर पार केले.
भारतीय नौदलाच्या जहाजांनी इडाई (आडीएआय) चक्रीवादळानंतर मोझांबिकमधील बैरा शहरात अडकून पडलेल्या जवळपास 3,500 लोकांची सुटका केली. तसेच मोझांबिकमध्ये संकटात सापडलेल्या लोकांचा बचाव करून त्यांना वैद्यकीय सेवा आणि मदत पुरविली.
हे आपण वाचलंत का?
कोट्यावधी जनतेची मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर, जयंती विशेष लेख.
लतादीदींचा जीवनप्रवास पाहूया त्यांच्या काही दुर्मिळ छायाचित्रांमधून
आयएनएस मगर या नौदलाच्या जहाजाने एप्रिल, 2019 मध्ये बैरा आणि मोझांबिकमधील आपद्ग्रस्तांसाठी 250 टन तांदूळ आणि महामारीतून बचाव करण्यासाठी आवश्यक असणा-या सुमारे 500 टन औषधांचा पुरवठा केला. आयएनएस केसरीने डिसेंबर, 2021 मध्ये मोझांबिकला 500 टन अन्नधान्याची मदतही केली असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी आज- 7 फेब्रुवारी, 2022 रोजी राज्यसभेमध्ये संजय सेठ यांना लेखी उत्तरामध्ये दिली.