कोरोनाचे नियम पाळून शाशनने गायनकोकिळा त्यामुळे भारतरत्न लता मंगेशकर यांच्या दुःखद निधनामुळे दोन दिवस दुखवटा जाहीर केला असल्यामुळे अगदी साध्या पद्धतीने सूर्यनमस्कार महायज्ञ कार्यक्रम घेण्यात आला
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी/भंडारा योगाभ्यासी मंडळ/भारतीय योग विद्याधाम नाशिक, शाखा भंडारा. बरंगे श्वर मंदीर खाम तलाव भंडारा यांच्या विद्यमानाने दि. १४/०१/२०२२ ते ०७/०२/२०२२ ला विद्याभारतीद्वारे ७५ कोटी सूर्यनमस्कार महायज्ञ संकल्प वर्षात सुरु आहेत. त्यात सहभागी होण्याकरिता उपरोक्त संस्थेचे आजी व माजी योगसाधकांना आव्हान करण्यात आले होते. त्यानुसार प्रत्यक्षात व अप्रत्यक्षात (आभासी पद्धतीने) जवळ जवळ ८० योग साधक हजर झाले होते.
सर्व प्रथम उपस्थित योगसाधकांनी गानसम्राज्ञी “भारत रत्न” लता मंगेशकर यांना २ मिनिटे मौन धारण करुन श्रद्धांजली वाहली व त्यानंतर नियमित योगासने करण्यात आली व ठिक ७.०० वाजता ठरल्याप्रमाणे १२ संमंत्र सूर्यनमस्कार घातले. योगसाधकांनी प्रत्यक्षात आणि आभासी पद्धतीने सूर्यनमस्कार महायज्ञात आपल्या नावाने आहुती समर्पित केली. त्यांची नावे संस्थेच्या दप्तरीत आहेत.
सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. माधव पाऊलझगडे सेवानिवृत्त मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ लाभलेत. त्याचप्रमाणे अध्यक्ष श्री नारायण चोले, उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र व्यवहारे व इतर योगसाधक जातीने हजर होते.
शासनाचा लता मंगेशकर यांच्या दुःखद निधनामुळे २ दिवस दुःखवटा जाहीर असल्यामुळे मंडळाने कार्यक्रमाची सांगता फारच साध्या पद्धतीने पार पाडली.
भंडारा योगाभ्यासी मंडळ हे भंडारा शहरात १९८० पासून कार्यरत आहेत. अंधविद्यालय भंडारा, सहकार नगर भंडारा, अग्रेसन भवन नागपूर नाका, संताजी सेवा मंडळ भंडारा, हनुमान मंदीर मोठा बाजार, रामदासी मठ भंडारा, बहिरंगेश्वर मंदीर, खांबतलाव भंडारा येथे अविवरत योगासन वगाचे धडे प्रत्यक्षात गिरविले आहेत व सुरु आहेत १९९८ ते २०१९ पर्यंत २१ वर्षे सतत रथसप्तमी प्रित्यर्थ जात आहे सर्व शाळांमधून सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. परंतु कोरोनाच्या साथीमुळे २०२० ते २०२२ पर्यंत रथसप्तमी प्रित्यर्थ शाळेतील स्पर्धा व कार्यक्रम बंद आहेत. परंतु भंडारा नगरात विद्या भारती द्वारे ७५ कोटी सूर्यनमस्कार महायज्ञ संकल्प वर्षात सुरु आहेत व त्यामध्ये माजी व आजी योगसाधकांचे नाव देवून त्यांच्या नावाने आहुती पडावी म्हणून नाव देण्यात आले व आपली मुक संमती गृहीत धरुन भंडारा योगाभ्यासी मंडळाकडून योग धारकांच्या नावाने नावाने तक्ता भरण्यात आले हे गृहीत धरण्यासाठी योगसाधकाच्या आउ यावे. रथसप्तमी प्रित्यर्थ ७ फेब्रुवारी २०२२ बहिरंगेश्वर मंदीरात खांबतलाव येथे सकाळी ६ ते ७ या वेळात येवून सूर्यनमस्कार घेण्यात आले
यावेळी अध्यक्ष नारायण चोले, उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे, कार्यवाह दीपक व्यवहारे, संजय मते, बाळकृष्ण सार्वे, वीरेंद्र गभने, योगिनी कांतोडे, नंदा तिडके व जास्तीत जास्त संख्येने योग अभ्यासक उपस्थित होते