जळीतकाडांचा ९ तारखेला निकाल, अंकिताच्या स्मृतिदिनाच्या अगोदर एक दिवस निकाल!

50

जळीतकाडांचा ९ तारखेला निकाल, अंकिताच्या स्मृतिदिनाच्या अगोदर एक दिवस निकाल!

जळीतकाडांचा ९ तारखेला निकाल, अंकिताच्या स्मृतिदिनाच्या अगोदर एक दिवस निकाल!

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

हिंगणघाट ०७/०२/२०२२
राज्यात खळबळ माजवणाऱ्या हिंगणघाट येथील जळीत कांड प्रकरणाचा निकाल 9 फेब्रुवारीला लागणार आहे. न्यायालयाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
राज्यात खळबळ माजवणाऱ्या हिंगणघाट येथील जळीत कांड प्रकरणाचा निकाल 9 फेब्रुवारीला लागणार आहे. या प्रकरणात पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कार्यालयीन कामकाजच्या केवळ 19 दिवसातच 426 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयातही या प्रकरणात एकूण 64 सुनावणी घेत 29 साक्षदरांचे प्रत्यक्ष जबाब नोंदविण्यात आले आहे. घटनेला दोन वर्षे झाली असून अंकिताच्या मृत्यूला 10 फेब्रुवारी रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. 9 फेब्रुवारीला निकाल लागणार असल्याचे सांगण्यात आल्याने अंकिताच्या मृत्यूला 2 वर्षे पूर्ण होताना हा निकाल लागणार असल्याचे दिसते. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंकिता हिंगणघाटच्या स्व. आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. यामध्ये पीडिता 3 फेब्रुवारीला 2020 ला सकाळी तिच्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी विकेश नगराळे दबा धरुन बसला होता. अंकिता दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतील पेट्रोल काढलेली पेट्रोल तिच्यावर ओतले आणि तिला पेटवून टाकले.

यात गंभीररीत्या जळालेल्या अवस्थेत नागपूरातील ऑरेंजसिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु झाले. मात्र आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 10 फेब्रुवारीला तिने अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता.