मौजा देवमुंढरी येथे राबविण्यात आली कौशल्य विकास योजना
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी/तुमसर :- छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान तुमसर च्या वतीने मौजा देवमुंडरी जि.नागपुर ला कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण संपन्न झाले. ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची इत्यंभूत माहिती मिळावी व त्या योजनांचा लाभ घेता यावा या हेतूने स्किल इंडिया अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना स्वयम रोजगार करता यावा या हेतूने इलेक्ट्रिशीयन प्रशिक्षण देण्यात आले. या योजनेतून लाभार्थ्यांना स्किल इंडिया तर्फे प्रशस्तीपत्र, टी- शर्ट, चे वाटप करण्यात आले. या वेळी मास्क व सैनीटायझर चा वापर व सामाजिक अंतराचे विशेष पालन करत प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. या समयी छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान चे अध्यक्ष/संस्थापक इंजि. नितीन धांडे, यांनी उपस्थितांना प्रतिष्ठानच्या विविध कार्याची माहिती दिली व अशा व इतर योजना राबविण्याचे आश्वासन दिले. प्रतिष्ठानचे सचिव प्रा.अमोल उमरकर, उपाध्यक्ष विक्की साठवने, संपर्क प्रमुख कोमल वानखेडे,सुमित जिभकाटे, मनोज बोपचे, नितिन सार्वे, प्रशांत वासनीक, साक्षी चन्ने, दीपाली मते, प्रधूम पटले, झुलेसिंह राखडे, एकनाथ पंचबुधे, जैकिशन कुथे, अजय लखाडे,विक्की देवगडे इत्यादीच्या उपस्थित व स्किल इंडियाचे समन्वयक इंजि. श्री. हरीश तरटे यांच्या नेतृत्वाखाली सदर प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पाडण्यात आले.