झोपडपट्टी अतिक्रमण धारकांचे हिंगणघाट उपविभागीय कार्यालयासमोर साखळी उपोषण.
शासकीय झोपडपट्टी पुनर्वसन कायदा अंतर्गत स्थायी पट्टे देण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांची मागणी.
प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
हिंगणघाट:-०७ फेब्रुवारी २०२२
हिंगणघाट शहरातील सर्व झोपडपट्टी धारकांना “शासकीय झोपडपट्टी पुनर्वसन कायद्या” अंतर्गत महसूल विभागा तर्फे नगरपरिषद नगरपंचायत ग्रामपंचायत हद्दीतील सर्व लाभार्थ्यांना स्थायी पट्टी देण्यात यावे तसेच वनविभागा अंतर्गत आदिवासी व पारधी समाजातील लोकांना शेतजमिनी व घरकुलाचे स्थायी पट्टे देण्यात यावे या सर्व मागणीकरिता झोपडपट्टी अतिक्रमण धारकांचे साखळी उपोषण हिंगणघाट उपविभागीय कार्यालयासमोर पहिल्या दिवसाची सुरुवात दिनांक ०७ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू केले आहे. त्या उपोषण मंडपाला माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
झोपडपट्टी अतिक्रमण धारक स्थायी पट्टी देण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात लढाई लढत आहे. दिनांक ३० ऑगस्ट २०२१ ला दिलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले होते की झोपडपट्टी अतिक्रमण धारकांना स्थायी पट्टे लवकरात लवकर निर्णय घेऊन देण्यात यावे अन्यथा हिंगणघाट उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर उपोषण मंडप टाकून उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला होता. परंतु तोडगा न निघाल्यामुळे झोपडपट्टी धारकांनी आपल्या न्यायी हक्कासाठी साखळी उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत स्थायी पट्टी देण्याबाबत निर्णय लागत नाही तोपर्यंत हे उपोषण असेच सुरू राहणार असे त्या वेळी झोपडपट्टी अतिक्रमण धारकांच्या वतीने सांगण्यात आले.
मागील २५ ते ५० वर्षापासून हिंगणघाट शहरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी, कामगार,गोरगरीब जनता वास्तव्य करतात. गरीबीची परिस्थिती असल्यामुळे गोरगरीब जनतेने झोपडपट्टीत घरे बांधून राहत आहे.
मौजा पिंपळगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या मागे कमला नेहरू हायस्कूल जवळ रस्त्यालगत झोपड्या बांधून वास्तव्य करीत आहे. त्या वस्तीत सामाजिक न्याय विभागाचे हॉस्टेल बांधले आहेत.
तरी झोपडपट्टी धारक श्यामराव केशव मोहिजे, आकाश कांबळे, संदीप डायगव्हाणे, अनिल सोनी,बेबीताई मोहिजे, राष्ट्रपाल पाटील,डिंपल सोनी, अर्चना पाटील,मनीषा बावणे, आशिक शेख, रुपेश बावणे, मंदाबाई डायगव्हाणे ,अंतरा बोरडकर, स्वीटी अंबाळकर, स्वराज अंबाळकर, सविता बुरडकर,कल्याणी डायगव्हाणे, रुखमा वांढरे,रामकृष्ण भट, सुवर्ण वांढरे, गजानन मुळे इत्यादी झोपडपट्टी धारकांना झोपडपट्टी कायद्याअंतर्गत महसूल विभागातर्फे स्थाई पट्टे देण्याच्या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. तसेच उपोषणकर्त्यांनी हिंगणघाट शहरातील सर्व झोपडपट्टी अतिक्रमण धारकांनी या उपोषणामध्ये सहभाग घेण्यासाठी आव्हान करण्यात आले आहे.
तसेच हिंगणघाट,समुद्रपूर व सिंधी (रेल्वे) विधानसभा क्षेत्रातील सर्व झोपडपट्ट्यांचा सर्वे करून यादी तयार करावी आणि झोपडपट्टीधारकांना सरकारच्या झोपडपट्टी कायद्या अंतर्गत महसूल विभागाने स्थायी पट्टे देण्यात यावे अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्यासह झोपडपट्टी धारक यांनी केली आहे.