पोटरा” मराठी चित्रपटाची आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हल कार्नीव्हल सिंगापूर मध्ये भारताचा वाढवला मान.
● युनाइटेड कींगडम येथील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये पोटरा झळकणार.
● मराठी चित्रपटाची आंतरराष्ट्रीय पातळीवर जादू कायम.
● प्रसिद्ध कॉस्ट्यूम डिजाइनर सुप्रिया ढोके यांच्या कॉस्ट्यूमचे सर्वीकडे कौतुक.

✒प्रशांत जगताप कार्यकारी संपादक✒
📱9766445348
नागपुर:- पोटरा” या मराठी फ्युचर चित्रपटास कार्नीव्हल सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हल मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर दुसरी कडे या चित्रपटाला युनाइटेड कींगडम येथील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल साठीही या चित्रपटाची निवड झाली आहे. त्यामूळे मराठी चित्रपट असलेल्या पोटराची जादू आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचली आहे. पोटरा या चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर अर्जुन धोत्रे यांनी केली आहे. त्याचा हा पहिला वहिला चित्रपट असुन त्यामूळे या बहुमानामुळे त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला एक मानाचे स्थान निर्माण झाले आहे.
पोटरा” या मराठी चित्रपटाची कथा ही ज्वलंत असुन ग्रामीण भागातील युवा तरुण वयीन मुलीची होणारी सामाजिक आणि कौटुंबिक परवड यावर आधारित आहे. या चित्रपटात स्त्री जीवनाचे रेखाटलेले पात्र हे मधमाशीचे जिवन या दोन्हीचे उत्तम मिश्रण यात दाखवून दिलं आहे. आज सर्वीकडे महिला वर्गाची होणारी परवड आणि दुसरीकडे मधमाशीचे जिवन कशा पद्धतीने एकच आहे. हे वास्तव्य या चित्रपटातुन दाखवून समाजामध्ये महिलांचे स्थान किती महत्वाचे आहे हे अद्योरेखीत केले आहे.
या चित्रपटासाठी निवडण्यात आलेल्या कलाकारांची निवड ही ग्रामीण भागातून करण्यात आली आहे. त्यासाठी सर्वानी खुप परिश्रम घेतले. या चित्रपटाचे चित्रीकरण सोलापुर जिल्हातील ग्रामीण भागात करण्यात आले. त्यामूळे या चित्रपटाला ग्रामीण भागाचे टच देण्यात आले. त्यामूळे हा चित्रपट पाहतांना त्या चित्रपटात जणु आपणच उभ आहे असे दिसून येते.
या चित्रपटाचे चित्रीकरण रणजित माने यांनी केले तर संपादन प्रदिप पाटोळे यांनी केले आहे. साउंड डिझाईनचे काम डॉ. समीर सुमन यांचे असुन कथा, पटकथा, दिग्दर्शन शंकर अर्जुन धोत्रे यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती शरद शिंगाडे आणि नटराज एंन्टरटेनमेंट या निर्मिती संस्थने केली आहे. या चित्रपटाचे कॉस्ट्यूम डिजाइन नागपुरच्या प्रसिद्ध कॉस्ट्यूम डिजाइनर सुप्रिया ढोके यांनी केल आहे.

सुप्रिया ढोके या एक प्रसिद्ध कॉस्ट्यूम डिजाइनर म्हणून यांनी आपल नाव मानाने झळकावल आहे. त्यांनी अनेक मराठी चित्रपट आणि अल्बम सॉंग तसेच चित्रपट क्षेत्रा बरोबरच फॅशन फोटोग्राफी करता ही काम केले आहे.सुप्रिया ढोके यांनी अक्षय फोटोग्राफी च्या माध्यमातून इंद्रायणी हैण्डलूमस करता फॅशन स्टाइलिस्ट म्हणून काम केलेले तसेच त्यांनी नागपुर च्या प्रसिद्ध (Ned’s make over) नेद’स मेक ओवर आणि झोया मेक अप स्टुडिओ यांसाठी त्यांनी मॉडलिंग केली आहे. सुप्रिया ढोके या एक मल्टीटास्किंग आर्टिस्ट सुद्धा आहेत. ज्या वेळी चित्रपट किव्हा ड्रामा मध्ये नटी आणि नट यांच्या अभिनयाची प्रसंशा करण्यात येते. पण त्यांना एक ऊत्तम कॉस्ट्यूम आणि हेयर ड्रेसर आणि अनेक सपोर्टिंग क्रूमेंबर मुळे हे शक्य होत असते. सुप्रिया ढोके यांनी चित्रपटात आणि फॅशन फोटोग्राफी करता अनेक कलाकाराचे कॉस्ट्यूम आणि हेयर ड्रेसरचे काम केले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटा करिता सोलापूर चे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रकार शशिकांत धोत्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले त्या मुळे या चित्रपटाचा दर्जा आणखी उत्तम ठरतोय.