कोट्यावधी जनतेची मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर, जयंती विशेष लेख.

122

कोट्यावधी जनतेची मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर, जयंती विशेष लेख.

आज जगातील महान महिलाच्या ईतिहासात त्याग आणि संघर्षाची जी परिभाषा लिहण्यात येते त्यावेळी रमाई भीमराव आंबेडकर यांचे नाव महान स्त्री म्हणून आदराने घेतले जाते.

कोट्यावधी जनतेची मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर, जयंती विशेष लेख.
कोट्यावधी जनतेची मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर, जयंती विशेष लेख.

✒लेखक: प्रशांत जगताप ✒
कार्यकारी संपादक मीडिया वार्ता न्युज
📱7385445348

आधुनिक भारताच्या ईतिहासाच्या जळणघडणीत अनेक महान समाज सुधारकांनी मौलाच योगदान दिल आहे. त्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मानाने घेतले जाते. पण त्या नावामागे जी स्फूर्ती नीडर पणे उभी होती ती म्हणजे माता रमाई. त्याच्या अपार कष्टाने भीमराव आंबेडकर हे या कोट्यावधी जनतेचे बाबा झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक सजीव प्राणी मात्रांना खरे हक्क अधिकार मिळवून दिले. त्यांनी केलेल्या सामाजिक क्रांतिने देशाचा प्रगतीत भर टाकणारी आहे. त्यांच्या महापरीनिर्वाणा नंतर ही अनेक आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आंदोलनाची प्रेरणा बनून देशात एक नव क्रांतिचे बिजे पेरत आहे. भारतात अनेक महिलांनी इतिहास लिहला आहे. पण काही महिला अशा होत्या की त्यांनी तर लाखो करोडोचा पोसिंदा जगला पाहिजे म्हणून आपल सर्व काही मिटवल हे फक्त माता रमाई यांच्या जीवनात दिसून येत.

7 फेब्रुवारी 1898 ला रमाई यांच्या जन्म झाला धोत्रे कुटुंबाची आर्थिक स्थिति अगदी गरिबीची होती. अगदी लहान पणी आई आणि वडीलाचे निधन झाले रमाई आणि त्याचे भाऊ आणि बहिनी आई बाबाना पोरके झाले. त्यात मामा त्याना आधार दिला आणि पालनपोषण केल.

1906 मध्ये 9 व्या वर्षी रमाईच लग्न 14 वर्षीय भीमराव यांचा बरोबर मुंबई येथील भायखळा येथील मार्केट मध्ये झाल. रमाई ला भीमराव प्रेमाने ‘रामू’ असे म्हणत असे आणि त्या भीमराव यांना ‘साहेब’ म्हणून संबोधित करत होत्या. लग्नाचा काहीच दिवसात रमाई ला भीमरावात अस काही दिसून आल की, भीमराव हे माझे पती जरी आहे पण ते या गुलामीच्या गर्देत कुजत सडत पडलेल्या समाजाचे ते उद्रारक बनून आले आहे. आणि आपले साहेब हे या अनाथ समाजाचे समाजउद्धारक आहे. त्यामूळे आपल्याला त्यांना तन मन धनाने सहकार्य केल पाहिजे हे माता रमाईने मनाशी ठासुन घेतल. आणि जीवनाचा अंतीम श्वासा पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाला रमाईने योगदान दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या ‘थॉट्स आन पाकिस्तान’ हे पुस्तक रमाई यांना समर्पित करते वेळेस बाबासाहेब यांनी लिहल “एक मामुली भीमाराव वरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर बनण्याचे श्रेय हे रमाई जाते”.

आज समाजात जी गुलामी मानसिकता आहे ती फक्त शिक्षणा मुळेच दुर हौऊ शकते अस बाबासाहेबाना नेहमी वाटायचं त्यामूळे त्यांनी उच्चशिक्षण घेण्याची इच्छा रमाई समोर व्यक्त केली. आणि बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशी गेले. घरची परस्थिती गरिबीची त्यात परिवाराची आणि मुलाची जाबबदारी एकट्या रमाई वर आली. त्यात एका पाटोपाट सासरे रामजी गेले, दोन रुपयाच्या दवाई वीणा मुल तडफडुन गेली. पण रमाई कधी हरली नाही. ती आपल्या परिवारासाठी शेनाच्या गौ-या बनवून बाजारत विकुन बाबासाहेबांना पण शिक्षणासाठी पैसे पाठवत होती. या सर्वात त्यांच्या पाच मुला पैकी फक्त यशवंत हा मुलगा जिवंत राहला.

‘गळ्यात एकही दागीना नाही म्हणून बाया माझी चेष्टा करता व टोचून बोलतात’ अशी व्यथा एकदा आमच्या माता रमाई ने पत्रातून बाबासाहेबांना कळवली होती. बाबासाहेब या समाजाला अंधार गृहातून प्रकाशाच्या शिखरावर नेण्याच्या असीम कष्टात आपल्या रामूला अंगभर वस्त्र पण देऊ शकत नव्हते. म्हणून पत्रातच रमाईची समजूत काढतांना बाबासाहेब म्हणतात की, ‘रामू कुणालाही मिळाला नाही असा दागिना तुला मिळेल आणि अश्या कोट्यावधी लोकांच्या गळ्यातला दागिना होशील त्या दु:खाचे आभार मान, दु:ख माणसाला मोठे करतात’.

रमाईने आयुष्याच्या महादु:खाचे स्वागत केले. वेदनांचा सत्कार केला. म्हणून रमाई आज कोट्यावधी लोकांच्या गळ्यातली ताईत (दागिना) बनली.

आज जयंतीदिनी आईसाहेब रमाई यांना विनम्र अभिवादन…!