जोगेश्वरीत विद्यार्थ्यांना मिळाले धनुर्विद्या व रोप स्कीपिंगचे धडे

94

जोगेश्वरीत विद्यार्थ्यांना मिळाले धनुर्विद्या व रोप स्कीपिंगचे धडे : बालविकास विद्यामंदिर शाळेत राबविला उपक्रम 

पूनम पाटगावे

जोगेश्वरी प्रतिनिधी

६ फेब्रुवारी: सॅजिटेरिअस स्पोर्ट्स क्लबचे संचालक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक माननीय सुभाषचंद्र नायर व रितिका नायर यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई संचालित बालविकास विद्यामंदिर व आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल जोगेश्वरी (पूर्व) या शाळेत संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांच्या प्रयत्नाने स्वस्थ भारत सुदृढ भारत या संकल्पनेतून

 मुलांच्या खेळ विश्वाची आवड लक्षात घेता क्रिडा प्रशिक्षक वैभव सागवेकर , रोहन मोरे , जगन्नाथ शेटकर यांनी धनुर्विद्या तसेच रोप स्कीपिंग प्रात्यक्षिक उत्तमरीत्या दाखविले. खेळामुळे शरीर चपळ बनते, इंद्रियांवर अफाट नियंत्रण ठेवले जाते. कार्यक्षमता वाढते याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. लहानपणापासून खेळले जाणारे खेळ आरोग्यासाठी मोठेपणीही खेळायला हवेत असा संदेश शाळेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांनी दिला.

          याप्रसंगी संस्थेचे उपकार्याध्यक्ष व आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल चेअरमन सहदेव सावंत , प्रशासकीय अधिकारी अशोक परब , चिटणीस यशवंत साटम , माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ इंगळे, पर्यवेक्षक जगदीश सूर्यवंशी, अधिवेशन प्रमुख राजेंद्र निळे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनाली परब , आरजेएमडीएस च्या मुख्याध्यापिका डिंपल दुसाणे, शबनम हुल्लर शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.