माणगांव तालुका बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची आढावा व सहविचार सभा आमदार प्रकाश सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती
सचिन पवार
रायगड ब्युरो चीफ
मो: 8080092301
रायगड :-माणगांव तालुका बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची आढावा व सहविचार सभा रविवार 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. बोरिवली येथे आ. प्रकाश सुर्वे हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या आढावा सभेसाठी मागाटणे विधानसभा आ. यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित शिवसैनिक यांना मार्गदर्शन करताना सांगितले, आ. भरत गोगावले यांच्या सारखा आ. मिळणे खूप कठीण आहे. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन काम करण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु ते अशक्य होत आहे.
या आढावा सभेसाठी माणगांव तालुका प्रमुख ऍड. महेंद्र मानकर, प्रमोद गोगावले, उपतालुका प्रमुख नितीन पवार, उपतालुका प्रमुख प्रशांत अधिकारी, माणगांव पंचायत समितीचे माजी उपसभापती सुजित शिंदे,सुभाष नलावडे, सुनिल मालुसरे, युवा उपजिल्हा प्रमुख अविनाश नलावडे, गणेश समेळ, सुधीर पवार, राजेश कदम, राकेश तुपट, ज्ञानेश्वर उत्तेकर, एकनाथ सुकूम, मनोज सावंत, संतोष पोळेकर, स्वप्निल शिर्के,प्रकाश रणपिसे, सुरेंद्र पालांडे, निलेश कदम, सभेचे आयोजक चंद्रकांत जोरकर, व जयेश सावंत तसेच माणगांव तालुक्यातून शिवसेना पदाधिकारी व मुंबई याठिकाणी असलेले पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी आ. प्रकाश सुर्वे म्हणाले, कोकण विभाग विकासाच्या माध्यमातून पाठमागे राहिला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात जाऊन बघा तेथील शेतकरी उसाचे मळे पिकवतात परंतु आपला तरुण मुंबई जवळ असल्यामुळे धंद्याकडे वळत नसून नोकरी करीत असतो. यावेळी उप तालुकाप्रमुख नितीन पवार यांनी आ. भरत गोगावले यांनी गावोगावी डोंगर दऱ्यात जाऊन विकास करीत आहेत. तसेच प्रत्येक गावा गावात जाऊन बैठक घेतली पाहिजे व आपल्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचा प्रचार व प्रसार करणे आवश्यक आहे.
तसेच या सभेचा मुख्य उद्देश जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण, ग्रामपंचायत या ठिकाणी पदाधिकारी नेमणूक करणे हा असून प्रत्येक शिवसैनिक यांनी कामाला लागले पाहिजे.