सेकंडरी स्कूल चिरनेर दहावी 1985 ग्रुपची ऐतिहासिक किल्ले रायगड सह
सचिन पवार
रायगड ब्युरो चीफ
मो: 8080092301
रायगड :-छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी..जय शिवराय, छत्रपती धर्मवीर संभाजीराजे की जय, राजमाता जिजाऊ माता की जय अशा संपुर्ण सहलीत घोषणा देत सेकंडरी स्कूल चिरनेर दहावी 1985 ग्रुपची ऐतिहासिक सहल दि 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या सहलीत पाली येथील अष्टविनायकामधील बल्लाळेश्वराचे दर्शन , मुगवली येथील स्वयंभू गणपती चे दर्शन , गांधारपाले येथील बौद्धकालीन लेणी, पाचाड येथील राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा वाडा,पाचाड कोट आणि समाधी चे सर्वांनी नतमस्तक होऊन दर्शन घेतले.
रात्री सहयाद्री च्या पर्वतरांगेत असलेल्या रायगड फार्म हाऊस .2 येथे वस्ती केली.या ग्रुपमधील उत्तम आचारी दिपक म्हात्रे याने अतिशय स्वादिष्ट असे मटण बनवले होते.सर्वांनी मटण भाकरी आणि वालाच्या शेंगांची पोपटी यांवर यथेच्छ ताव मारला.यानंतर गाणी आणि अनंत म्हात्रे याच्या नकला यामुळे सर्वजण पोट भरून हसले.दुसऱ्या दिवशी पहाटे उठून लवकरच किल्ले रायगड च्या दर्शनासाठी सर्वजण रवाना झाले.
मेणा दरवाजा, पालखी दरवाजा, राण्यांचे महाल, छत्रपती शिवाजी महाराजांचा वाडा, धान्याचे कोठार, गंगा सागर तलाव, मेघडंबरी, राजदरबार, नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ, शिरकाई मंदिर, कुशावर्त तलाव, टकमक टोक, जगदीश्वराचे मंदिर आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी चे दर्शन घेतले. सर्वांनी छानशी अशी फोटोग्राफी केली.
सहलीला जाताना गाडीमध्ये शूर आम्ही सरदार, एकच राजा इथे जन्मला, आम्ही डोंगरचे राहणार चाकर शिवबाचे होणार , छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार अश्या ऐतिहासिक गाण्यांनी अंगावर रोमांच उभे राहत होते.या ग्रुपमधील आज अनेक जण उच्यपदस्थ आहेत.मात्र इथे लहान मोठा हा भेदभाव मुळीच नाही.प्रत्येक सहल आणि स्नेहसंमेलन मध्ये सर्वजण एकदिलाने सहभागी होत असतात. अशी माहिती या ग्रुपचे अडमीन मिलिंद खारपाटील यांनी दिली.
या सहलीत मिलिंद खारपाटील, उपकार ठाकूर, राजेंद्र म्हात्रे, चंद्रहास म्हात्रे , सूर्यकांत म्हात्रे, प्रकाश नारंगीकर, राजेंद्र मुंबईकर, गजानन फोफेरकर, रोहिदास ठाकूर, प्रकाश फोफेरकर, सुरेश केणी, चंद्रकांत गोंधळी, दिपक म्हात्रे, प्रभाकर ठाकूर ,रविंद्र पाटील, अनंत म्हात्रे असे 16 जण सहभागी होऊन सर्वांनी छ्त्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले.छत्रपती शिवरायांच्या राजधानीचा रायगड किल्ला पाहून आनंदित झालो.रायगड पुन्हा पाहू या असेही सहलीमधील काही वर्गमित्र म्हणाले.
यापुढील प्रत्येक सहलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा एक किल्ला पहायचा हा निर्धार व्यक्त करून या सहलीची सांगता झाली.