आमदार अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत रोटरी क्लब रोहाचा रायगड किल्ला अभ्यास दौरा विदेशी विद्यार्थ्यांसह यशस्वीरीत्या पूर्ण

47

आमदार अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत रोटरी क्लब रोहा चा रायगड किल्ला अभ्यास दौरा विदेशी विद्यार्थ्यांसह यशस्वीरीत्या पूर्

सचिन पवार

रायगड ब्युरो चीफ

मो:8080092301

रोहा :-रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रोटरी क्लब ऑफ रोहा व आमदार आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड किल्ला दुर्ग अभ्यासक व परदेशी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत रायगड किल्ल्याचा अभ्यासपूर्ण दौरा यशस्वीरीत्या पूर्ण केला.

छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द व त्यांचा इतिहास पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरावी तसेच त्यांच्या बद्दल अभिमान व आत्मीयता रहावी या उद्देशाने रोहा रोटरी क्लब व विदेशी विद्यार्थ्यांना घेऊन आमदार अदिती तटकरे व सदस्यांनी रायगड किल्ला अभ्यास दौरा पूर्ण केला.यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या शौर्याची गाथा व त्याची इतंबूत माहिती नवीन पिढीला व्हावी या उद्देशाने दुर्ग अभ्यासक जयकांत शिंकरे व सुखद राणे यांच्या माध्यमातून जिवंत देखावा उभा राहिल अशी माहिती आलेल्या सर्व रोटरीअन्स व विद्यार्थ्यांना देण्यात आली.

 यावेळेस दुर्ग अभ्यासक जयकांत शिंकरे यांनी ” छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अजून हजारो वर्ष टिकावा व नवीन पिढीला त्याचा अभ्यास घेता यावा यासाठी या वास्तूचा छत्रपती कुळातील वंशजयांनी, मायबाप सरकारने व पुरातन खात्याने देखभाल दुरुस्ती कडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे व या वास्तू जतन करण्यासाठी व येणाऱ्या नवीन पिढीला असाच जाज्वल इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा पाहता यावा हीच आमची दुर्गप्रेमींची व आलेल्या रोटरी क्लब सदस्यांची अपेक्षा असल्याचे ” सांगितले.यावेळेस रोटरी क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र निंबाळकर, खजिनदार मृदुला परांजपे, डायरेक्ट अनिल यादव ,रेंज कॉर्डिनेटर डॉक्टर वीरेंद्र नुल्ला, संजय नारकर, राजू शेठ पोकळे, भूषण लुमन, मनोज जैन आशिष शहा, सचिन मोदी ,आशिष दळवी, राजश्री पोकळे ,स्वप्नाली निंबाळकर ,सुनिता नारकर अशा इत्यादी अनेक रोटरी सदस्य व विदेशी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत रायगड किल्ला अभ्यास दौरा पूर्ण केला.