विविध समाजाच्या आरक्षणासाठी चंद्रपुरात निघाला महामोर्चा • मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करा : ओबीसी नेते राजेश बेले यांची मागणी

63
विविध समाजाच्या आरक्षणासाठी चंद्रपुरात निघाला महामोर्चा • मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करा : ओबीसी नेते राजेश बेले यांची मागणी

विविध समाजाच्या आरक्षणासाठी चंद्रपुरात निघाला महामोर्चा

• मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करा : ओबीसी नेते राजेश बेले यांची मागणी

विविध समाजाच्या आरक्षणासाठी चंद्रपुरात निघाला महामोर्चा • मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करा : ओबीसी नेते राजेश बेले यांची मागणी

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 7 फेब्रुवारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या दबावात येऊन मराठा आरक्षणाचा एकतर्फी निर्णय घेऊन जीआर काढला. या निर्णयामुळे ओबीसी सह इतर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करून सर्व समाजाला न्याय देण्याची मागणी ओबीसी नेते राजेश बेले यांनी केली आहे.

विविध सामाजिक संघटनांच्या वतीने ओबीसी (व्हीजे, एनटी, एसबीसी), अनुसूचित जाती- जमातीच्या आरक्षण बचाव आणि विविध मागण्यांसाठी बुधवारी, ७ फेब्रुवारी रोजी चंद्रपुरात महामोर्चा आयोजित करण्यात आला होता. गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर हा मोर्चा निघाला. या मोर्चामध्ये ओबीसी नेते राजेश बेले आपल्या शेकडो समर्थकांसह सहभागी झाले होते.

मोर्चाला विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, वरोरा-भद्रावतीच्या आमदार प्रतिभा धानोरकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिव सचिन राजूरकर, ओबीसी नेते राजेश बेले, शिवानी वडेट्टीवार, चंद्रपूर जिल्हा शिवसेना प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्यासह अनेक नेत्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. मोर्चात हजारो ओबीसी समाजातील कार्यकर्ते, अनुसूचित जाती-जमाती, विजेएनटी, एसबीसी बांधव सहभागी झाले होते. चंद्रपूर येथे ओबीसी, एस्सी, एसटी आरक्षण वाचविण्यासाठी काढण्यात आलेल्या महामोर्चात सहभागीना मार्गदर्शन करण्यात आले.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर विरोधी पक्ष नेते आणि ओबीसी नेत्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यात मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.