घुग्घुस येथे महिलांतर्फे डॉ. राजरत्न आंबेडकर यांचा सत्कार
🖋️ साहिल सैय्यद….
तालुका प्रतिनिधि घुग्घुस
📲 9307948197
घुग्घुस : येथिल बौद्ध सर्कल समिती व नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समितीच्या संयुक्त वतीने बोधिसत्व विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिbल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय भव्य धम्म संमेलनाचे आयोजन नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशीय समितीच्या परिसरात करण्यात आले होते.
कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करणाऱ्या महिलांतर्फे डॉ. राजरत्न आंबेडकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी दीप्ती सोनटक्के, योगिता मुन, सुजाता सोनटक्के, पुनम कांबळे, वैशाली दुर्योधन, नर्मदा खोब्रागडे, उर्मिला लिहीतकर, सरोज पाझारे, भाविका आटे, प्रीती तामगाडगे, आशा गुरले, ज्योती साठे, माया सांड्रावार, प्रियंका धुपे, शिल्पा सोंडुले, मनीषा वासेकर, निलिमा वाघमारे, पंचफुला पाटील, माधुरी चोखांद्रे, सिमा उरकुडे, सविता मंडपे, शिला निखाडे, शोभा पडवेकर, पार्वती सोनटक्के आदी उपस्थित होते.