परभणी प्रकरण: आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न? शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा निषेध!: आ. डॉ. नितीन राऊत

33

परभणी प्रकरण: आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न? शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा निषेध!: आ. डॉ. नितीन राऊत

✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो. 9373959098

नागपूर :- परभणीतील घटनेनंतर निलंबित पोलीस निरीक्षक दिवसभर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत का होते? ते नक्की काय करत होते? सरकारने यावर उत्तर द्यावे! सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांवर कठोर कारवाई का होत नाही? अशोक घोरबाड यांच्यावर ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास विलंब का?

शिंदे-फडणवीस सरकार आरोपींना वाचवत आहे का? दलितांवरील अन्याय सरकार डोळ्यादेखत का सहन करत आहे? हा अन्याय आम्ही सहन करणार नाही असे प्रतिपादन आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी केले.