राष्ट्रवादी नगर येथे माता रमाई जयंती साजरी

34

राष्ट्रवादी नगर येथे माता रमाई जयंती साजरी

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 7 फेब्रुवारी
संबोधी महिला मंडळ राष्ट्रवादी नगर , तुळशीनगर च्या विद्यमाने शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी ” त्यागमुर्ती माता रमाई ” यांची जयंती साजरी करण्यात आली. स्थानिक धम्मकिर्ती बुद्ध विहार येथे प्रभागातील धम्म उपासिका उपस्थित राहून माता रमाई च्या त्यागमय , वत्सल , व संघर्षमय जीवनातील कार्याला स्मरण करून आदरांजली अर्पण केली.
या प्रसंगी माता रमाई च्या जिवनावर धम्म भगिणीनी प्रकाश टाकला . विश्व विख्यात किर्तीचे महामानव, संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाची खऱ्या अर्थाने सावली बनून माता रमाईने संपुर्ण आयुष्य बाबासाहेबांना आणि समाजाकरीता समर्पित केले. मनात फक्त आणि फक्त दीन दुबळ्या समजाचीच चिंता व्यक्त करत , ऐश्र्वर्य जीवनाचा त्याग करून दलीत ,शोषित ,वंचित ,बहिष्कृत लोकांच्या न्याय – हक्कासाठी लढा देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना अखेरच्या श्वासापर्यंत साथ देणारी माता रमाई ही आधुनिक महिलांसाठी प्रेरणास्रोत ठरली आहे .
या कार्यक्रमास आयुष्यमती वैशाली सहारे यांच्या मार्गदर्शनात आयु. लीला रामटेके, माया ठेमस्कर , माया ब्राम्हणे , शोभा भडके , शोभा वनकर , आम्रपाली ढोले , कल्पना निमगडे , माला रामटेके, आणि समस्त उपासीका बहुसंख्येनी उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहार वाटप करून जयंती कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.