महापालिकेच्या जागेवर वाहन पार्किंग च्या नावाखाली केली जाते वसुली.

40

महापालिकेच्या जागेवर वाहन पार्किंग च्या नावाखाली केली जाते वसुली.

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
📞 7304654862 📞

मुंबई :- गोरेगांव पश्चिम हायपर सिटी लिंक रोड समोर व अंकुर बिल्डिंग च्या लगतच प्रेम नगर मधे जाणाऱ्या रोड वर जणू काही पार्किंग झोन मधे आल्यासारखे वाटत असते. त्याच कारण असं आहे कि, तिथे वाढणारी वाहनांची संख्या.सर्व वाहने प्रेम नगर मधे राहणाऱ्या रहिवाशांची असून, व त्या वाहनांना अधिकृत पार्किंग नसून सर्व वाहने तिथल्याच रस्त्यावरच पार्क करावे लागते.विशेष म्हणजे त्या पार्किंग चे पैसे त्यांना महिन्याच्या बोलीवर द्यावे लागते, हेच त्यांचं दुर्भाग्य म्हणावं लागेल.

कारण प्रेम नगरचा मुख्य रस्ता हा कोणाच्या मालकीची नसून, तो सार्वजनिक वाहतुकीस महापालिकेच्या आत्यारीत आहे. मुळात तिथे पार्किंग करणं अयोग्य च आहे, तरी सुद्धा अज्ञात लोंकाकडून तिथे वाहन पार्किंग देऊन त्यांच्याकडून अवैध वसुली केली जाते. तिथे बघितलं गेल्यास दररोज सुमारे तीन -चारशे वाहन कमीत कमी पार्किंग मधे उभी केली असतात, त्यात मोटर सायकल, ऑटो रिक्शा, टेम्पो, कार, अशा वाहनांचा समावेश असतो.

या सगळ्यांचा जर हिशोब केला तर महिन्याला तीस चाळीस हजार व त्या पेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात येत असावी, असा अंदाज करण्यात वावगं ठरणार नाही. जर हा प्रकार पालिकेच्या आदेशाने होत असेल तर तिथला पार्किंग चा सर्व कर मिळत असल्यास काहीच हरकत नाही, पण जर ही पार्किंग ची वसुली अन्य कोणी करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई व्हावी असा सूर तिथले स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

आता या सर्व प्रकाराकडे महापालिकेन गांभीर्याने घेणे खूप गरजेचे आहे, व तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवून संबंधित पार्किंग ठेकेदारावर गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कडक कारवाई ही स्थानिक नागरिकांची विनंती आहे. सदर आता पालिका व पोलीस प्रशासन काय भूमिका घेते बघावं लागेल, कि ही त्यांचीच भूमिका आहे, याचा आता शोध स्थानिक पत्रकार या नात्याने घेण्यात येईल, हे प्रशासनाने लक्षात घ्यावं व लवकरात -लवकर कारवाईचे आदेश देण्यात यावे ही प्रशासनाला आमची विनंती राहिल.