डॉक्टर बनले हैवान, निर्दयतेचा कळस! पैसे न भरल्याने चिमुरडीचे ऑपरेशन थांबवले, पोट न शिवताच कुटुंबीयांना दिला मृत्यूदेह.

50

डॉक्टर बनले हैवान, निर्दयतेचा कळस! पैसे न भरल्याने चिमुरडीचे ऑपरेशन थांबवले, पोट न शिवताच कुटुंबीयांना दिला मृत्यूदेह.

 Beast became a doctor, the pinnacle of ruthlessness! Chimurdi's operation was stopped due to non-payment of money.

✒प्रशांत जगताप कार्यकारी संपादक✒
उत्तर प्रदेश,दि 7मार्च:- युपी मधील प्रयागराज येथील खासगी रुग्णालयात डॉक्टर हैवान बनुन माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने प्रयागराज येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चिमुरडीचे ऑपरेशन कुटुंबीयकडे नसल्या मुळे ते पैसे भरू न शकल्याने थांबवण्यात आले. डॉक्टरांनी ऑपरेशन टेबलवरून पोट न शिवताच या चिमुरडीला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. यामुळे तिची तब्येत बिघडली आणि अखेर उपचारांअभावी तिचा मृत्यू झाला.

प्रयागराजमधील करेली भागात राहणाऱ्या ब्रह्मदीन मिश्रा यांच्या 3 वर्षीय मुलीला पोटदुखीचा खुप त्रास जाणवत होता. आई – वडिलांनी तिला प्रयागराजमधील एका प्रख्यात खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथे काही दिवसानंतर मुलीचे ऑपरेशन करण्यात आले. यानंतर आणखी एक ऑपरेशन झाले. या ऑपरेशनचे दीड लाख घेतल्यानंतर रुग्णालयाने आणखी 5 लाख रुपयांची मागणी केली. मात्र कुटुंबीय पैसे न भरू शकल्याने रुग्णालयाने निर्दयतेचा कळस गाठत या चिमुरडीला ऑपरेशन टेबलवरून थेट कुटुंबीयांच्या हाती सोपवले, अशी माहिती तिच्या वडिलांनी दिले.

निराश झालेल्या मिश्रा कुटुंबाने यानंतर अनेक रुग्णालयांचे उंबरे झिजवले. मात्र मुलीची तब्येत गंभीर असून ती वाचू शकत नाही असे म्हणत एकाही रुग्णालयाने तिला दाखल करून घेतले नाही. अखेर योग्य उपचारांच्या अभावी चिमुरडीचा मृत्यू झाला. यानंतर चिमुरडीच्या वडिलांनी रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली असून ऑपरेशनचे टाके न टाकताच तिला आमच्याकडे सोपवण्यात आल्याचा आरोप केला आहे.

वडिलांची मदतीची याचना.

दरम्यान, चिमुरडीच्या वडिलांनी सोशल मीडियाद्वारे आपल्यासोबत झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला होता. तसेच मुलीच्या उपचारासाठी मदतीची याचनाही केली होती. या व्हिडीओमध्ये चिमुरडीच्या पोटावर टाके नसल्याचे स्पष्ट दिसत होते. आता चिमुरडीच्या मृत्यूनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून जिल्हा प्रशासन, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी या रुग्णालयावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

घटनेचे गांभीर्य पाहून प्रयागराजचे जिल्हाधिकारी भानू चंद्र गोस्वामी यांनी तपासासाठी पथक बनवले आहे. चौकशीअंती जर कोणी दोषी आढळले तर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.