Due to the harassment of moneylenders, farmers are committing suicide in Yavatmal district.
Due to the harassment of moneylenders, farmers are committing suicide in Yavatmal district.

सावकारी वर्गाच्या त्रासामुळे शेतकरी वर्ग यवतमाळ जिल्यामध्ये आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत.

शेतकऱ्यांनसह सर्वसामान्यान कडून वसूल करताहेत सावकार अवाढव्य व्याज. 

Due to the harassment of moneylenders, farmers are committing suicide in Yavatmal district.
Due to the harassment of moneylenders, farmers are committing suicide in Yavatmal district.

साहिल महाजन, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी 

यवतमाळ/राळेगाव:- गरज वंताना पैशाची आवश्यकता असते कुणाच्या घरी मोठया आकाराने त्रस्त असतांना कर्ज घेण्याची आवश्यकता भासते. तर कोणी अपघातात गंभीर जखमी झाल्यास त्यालाही डॉक्टरची फी व औषधी खरेदी साठी पैशाची गरज असते. अशावेळी नाईलाजास्तव गरीब, मजूर सर्वसामान्य, व अल्पभूधारक  शेतकरी लवकर कर्ज मिळवण्यासाठी सावकाऱ्याच्या दारावर जात असतात. त्यावेळी भरमसाट व्याज आकारून सावकार त्याला कर्जाची रकम देत असतो. महिन्याचे व्याज चुकते करण्यासाठी त्याच्यावर दबाव आणतो अशावेळीच गरीब, अल्पभूधारक शेतकरी कर्जाच्या विळख्यात पडतो. आता शासनाप्रमाणे सावकाराने अवाढव्य व्याज आकारू नये असे कायदे केले असले तरी सतेपुढे शहाणपणा कुणाचेही चालत नसते. त्यामुळे बळी तो कान पिळी, या प्रमाणे आताही ग्रामीण भागात सावकाराचे व्यवहार चालू आहेत.

एकावेळी कर्जाच्या दलदलित डुबून गेलेला कोणताही व्यक्ती त्यातून त्याची सुटका होणे कठीण असते. सावकार ऐक महिण्यानंतर कर्जाच्या व्याजासाठी गरीब, मजूर, शेतकरी यांच्या दारावर येऊन व्याज चुकते करण्याची तसेच कर्जाची रक्कम भरण्यासाठी हेलपाटे लावत असतो एवढेच नव्हे तर स्टँप पेपरवरही लिउन घेतो. त्यावेळी गावातीलच  गावगुंडा करून त्याच कोऱ्या स्टॅम्प पेपरवर स्वाशदार मनून स्वाक्षरी करून घेतो काही अज्ञानी शेतकरी सावकाराच्या धमक्यांना घाबरून आपली थोडी फार जमीन विकून सावकाराचे कर्ज चुकते करतो. एवढेच नव्हे तर काही शेतकरी आपले पाळीव प्राणी विकून सावकाराचे कर्ज भरतो काही सावकार त्यांची पोच आमदार, खासदारापासून तर मंत्र्यान पर्यंत असतो. अशावेळी कर्ज घेणाऱ्या गरीब व्यक्तींना कर्ज घेतले असल्यास व त्याची तक्रार पोलीस ठाण्यातहि केली असल्यास लोकप्रतिनिधीनच्या दबावाखाली येऊन गरीब शेतकरी वर्गाला मोठा त्रास त्या सावकाराकडून व त्याच्या गावगुंड्याकडून दिल्या जातो.

मागील एक दोन वर्षापासून शेतकऱ्यांनची, शेतमजुराची दैयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीच्या आजारासाठी मुलामुलींच्या लग्नासाठी अखेर सावकाराकडून अशावेळी कर्ज घेण्याची पाळी येते. कर्ज घेतांना सावकार स्टँम्प पेपरवर लिउन घेत असतो त्यात दोन तीन जणांच्या स्वाक्षरीनुसार जमानत मनून स्वाक्षरी करीत असतो. अशा वेळी अवाढव्य व्याज आकारणी करून एवढीच रक्कम द्या असा दबाव कर्ज घेणाऱ्या व्यक्तीवर टाकतो. आजही तेच चालू आहे वरून कीर्तन व आतून तमाशा चा खेळ चालू असल्याने त्यावर कोणीही बंदी घालू शकत नाही. कर्जाचे ओझे वाढत जात असल्यामुळे तसेच सावकार कुणाच्याही समोर बेइज्जती करीत असल्यामुळे अखेरचा मार्ग म्हणून अल्पभूधारक गरीब गरीब शेतकरी, शेतमजूर अखेर आत्महत्या करन्याच्या मार्गाचा अवलंब करतो. हे वास्तव्य आहे. (शासनांनी कठोर पाऊले उचलण्याची गरज)   

आज शेतकरी आत्महत्या जिल्यामध्ये होत असल्यामुळे त्याचे कारण म्हणजे  निसर्गाने साथ सोडल्यामुळे व सावकारी वर्गा चा त्रास  शेतकरी सहन करीत असल्यामुळे शेतकरी वर्ग खूप भारी मात्रात संकटात सापडल्यामुळे व   यावर शासनस्तरावर शासनांनी शेतकऱ्यांवर उपाययोजना करण्याची गरज भासत आहे. यावर कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे असे सुज्ञ शेतकरी वर्गामध्ये बोलले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here