मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार.

52

मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार.

ज्येष्ठ पत्रकार अब्बासभाई यांचा सत्कार मनसे जिल्हाध्यक्ष ‘अतुल वांदिले’ यांचा हस्ते करण्यात आले.

 MNS felicitates journalists on the occasion of Marathi Official Language Day.

✒प्रशांत जगताप प्रतीनिधी✒

हिंगणघाट:- 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिवस कवीश्रेष्ठ कुसूमाग्रज आदरणीय विष्णु वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात हा दिवस वेगवेगळ्या स्वरूपात साजरा करण्यात येतो त्याच पार्श्वभुमीवर आज मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी सुद्धा मनसेच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.

लोकशाहीचा महत्वपूर्ण स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारिता या क्षेत्रात सतत कार्यरत असताना जनहितार्थ कामासाठी बुलंद आवाज करीत असणाऱ्या अशा प्रत्येक मराठी पत्रकारांचा मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी त्यांचा निवासस्थानी जाऊन मराठी राजभाषा दिनानिमित्त त्याच्या सन्मानार्थ गौरवपत्र, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांना मनसे मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे तर्फे जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित केल्या जाते. मागील अनेक वर्षापासून पत्रकार बांधव पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असल्याने त्याची कामगिरी कौतुकास्पद होत आहे. याच निमित्ताने मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे सर्व पत्रकार बांधवांचे सत्कार केल्याबाबत त्यांनी अतुल वांदिले यांचे भरभरून आभार मानले.

याप्रसंगी मनसे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, मनसे जिल्हा सचिव सुनील भुते, मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष रमेश घगारे, मनसे हि.तालुकाध्यक्ष प्रवीण श्रीवास्तव, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष राहुल सोरटे, मनसे रुग्ण सेवा जिल्हाध्यक्ष उमेश नेवारे, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष जगदीश वांदिले, मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अजय पर्बत, राजू मुडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.