समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटचा ‘गाव तिथे शाखा’ उपक्रम.

57

समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटचा ‘गाव तिथे शाखा’ उपक्रम.

Samata Sainik Dal Wardha District Unit's 'Gaav Tithe Shakha' initiative.

✒प्रशांत जगताप, कार्यकारी संपादक ✒

वर्धा:- समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटद्वारे गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक, विहार तिथे वाचनालय, या अभियानांतर्गत समता सैनिक दलाची शाखा स्थापन करण्यासंदर्भात श्रावस्ती बुद्ध विहार, सावरगाव,तालुका-कळंब, जिल्हा-यवतमाळ येथे सभा संपन्न झाली. यावेळी विचार मंचावर सभेचे अध्यक्ष म्हणून वर्धा जिल्हा संघटक मार्शल अभय कुंभारे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सह-संघटक अविनाश गायकवाड,जिल्हा समन्वयक गौतम देशभ्रतार, तालुका संघटक मनोज थुल,जिल्हा संरक्षण विभाग प्रमुख मार्शल प्रदीप कांबळे,भन्ते प्रज्ञाकाया, मार्शल अमोल ताकसांडे, मार्शल चंदू भगत, मार्शल रोशन कांबळे, मार्शल हर्षल गजभीये प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जिल्हा संघटक अभय कुंभारे व उपस्थित मान्यवरांनी सभेला मार्गदर्शन केले.

Samata Sainik Dal Wardha District Unit's 'Gaav Tithe Shakha' initiative.

सदर सभेला शुभम वाघमारे, किसन कांबळे, तानबाजी भगत, कैलास थुल, प्रशांत कांबळे, अमित पाटील, विनय किटके, सचिन वाघमारे, कपिल कांबळे, निकेतन कांबळे, अश्वजित भगत, सुरेश वाघमारे, प्रशांत फुलमाळी, कैलास थुल, कासना खडसे, प्रशिक धवने, निकेश फुलमाळी, विनय भगत, रूपेश तेलतुबडे, धम्मा हस्ते, प्रणय वाघमारे, संघम फुलमाळी, संजय मुन, विलास थुल, आकाश मुन, राजेश भगत, श्रीकांत सोनुले, सुरेश वाघमारे, सौ. वनिता संजय मुन, ऊषा प्रफुल फुलमाळी, लता अहिंसक भगत, अलकाबाई बाबाराव भगत, सुनंदा संजय धवणे, श्रेया कैलास थुल, स्रुष्टी विलास थुल, आचल किशोर वाघमारे, शिल्पा किशोर वाघमारे, सुनिता विलास थुल, अनुसया धवणे, कांता वाघमारे आदी बौद्ध बांधव तसेच गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.