Whether action should be taken against the police grandfather who is not proud of Marathi language
Whether action should be taken against the police grandfather who is not proud of Marathi language

मराठी भाषेचा अभिमान न बाळगणाऱ्या पोलिस दादावर कारवाई व्हायला हवी की नाही; पंकज ठाकरे

Whether action should be taken against the police grandfather who is not proud of Marathi language
प्रतीकात्मक फोटो

प्रा. अक्षय पेटकर प्रतीनिधी✒
नागपूर,दि.7 मार्च:- माझ्या आईच्या डोळ्याचा उपचार लता मंगेशकर हॉस्पिटल नागपुर मध्ये चालू असल्याने मी आज दिनांक 7 मार्च रोज रविवारला जेवणाचा डबा घेऊन नागपूरला गेलो. तसेच माझे नागपूरचे काम आटोपुन बुटीबोरीला यायला निघालो. सायंकाळी 6.30 च्या दरम्यान एअरपोर्ट चौक, प्राईड हॉटेलपासी सिग्नल बंद असल्यामुळे थांबलो. तेव्हा तेथे कार्यरत असणाऱ्या तीन ट्राफिक पोलीस दादा पैकी माझ्याजवळ एकजण आले आणि मला म्हणाले तुमच्या गाडीवर मराठीत नंबर टाकला आहे, हा नंबर चालत नाही. तुम्ही मराठीत नंबर का टाकला. तेव्हा मी त्यांना म्हणालो हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, मराठी आमची मातृभाषा आहे, मराठी भाषेवर आमचे नितांत प्रेम आहे म्हणून टाकला. तेव्हा ते म्हणाले तुम्हाला हा नंबर बदलावा लागेल, केव्हा हा नंबर इंग्रजी मध्ये टाकाल, तेव्हा मी त्यांना म्हटलं दोन दिवसात बद्दलवितो. तेव्हा ते म्हणाले तुम्हाला चालान भराव लागेल मी म्हटलं ठीक आहे. त्यानी मला लायसन्स मांगीतल, त्यांना मी लायसन्स दिल, त्यांनी ते आपल्या सहकार्याकडे दिल. त्यांचे सहकारी मला म्हणाले अस का बरं, मी म्हटलं मराठी भाषेवर प्रेम आहे आमचं, आम्ही शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो. तेव्हा त्यांनी नंबरचा फोटो काढला व म्हणाले पैसे किती आहे. माझ्या पाकिटात फक्त 100 रुपये होते. मी म्हटलं आता चालान यांच्याकडून घेतो व नंतर भरतो तर काय ते माझ्याकडे आले व माझ्यापासचे 100 रुपये घेतले व म्हणाले तुम्ही जा आता मी जे चालान केलं होतं ते डिलेट करतो. मी तेथून निघालो बुटीबोरी ये पर्यंत मनात सारखा विचार येत होता की जो माणूस मोठमोठ्या लोकांच्या भष्ट्राचार विरुद्ध लढत आहे. आज माझ्यासोबत घडलेला प्रकार खरच योग्य होता का? मराठी भाषेचा अभिमान नसणाऱ्या व चुकीच्या मार्गाने पैसा कमविण्यासाठी आपल्या मातृभाषेचा व शीवाजी महाराजांचा अभिमान नसणाऱ्या चालान न फाडता चुकीच्या मार्गाने पैसे घेणाऱ्या पोलीस दादावर कारवाई व्हायला हवी अस मला वाटलं. हा सर्व प्रकार त्या चौकात लागलेल्या तसेच प्राईड हॉटेलच्या कॅमेरामध्ये नक्कीच संग्रहित झाला असेलच.

चांगले पगार असल्यावर 100 रुपयासाठी आपला स्वाभिमान विकणाऱ्या, पोलीसदादावर नागपूर पोलीस आयुक्तांनी कारवाई करावी अशी नम्र विनंती..
पंकज ठाकरे, संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी फाऊंडेशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here