राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदे”चा एल्गार, झाले पंचायत समिति प्रशासन थंडगार
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो.9860884602
*पाचोरा पंचायत समिति कार्यालय पाचोरा येथे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गफूर तडवी यांच्या नेतृत्वाखाली मा.रणजीत तडवी तसेच मा.adv. रोहित ब्राम्हणे(ILA जळगाव जिल्हाध्यक्ष) यांनी अक्षरशः तालुका पंचायत प्रशासन धारेवर धरून ठेवले. संबंधित आणि जबाबदार प्रशासनास जाब विचारण्यास भाग पाडले.विषय ही तेवढाच गंभीर,प्रश्न ही अगदी हातावर पोट असणाऱ्या गरीब तसेच वंचित-पीड़ित- बेघर-निराधार आदिवासी, मुस्लिम व इतर समाजाचा.* पिंपळगाँव ब्लॉक अंतर्गत येणाऱ्या काही गावातील 1300ते 1400 पात्र आणि मंजूर घरकुल अंतर्गत येणाऱ्या खऱ्या लाभार्थ्यांचा. घरकुल प्रकरण अगदी मंजूर…लाभ प्राप्त म्हणून अगदी संबंधित अधिकारीकृत सहीनिशि रजिस्ट्री नोंद देखील केलेली पण मात्र घडविलेला प्रशासनाने उपक्रम मात्र उलट-खेदजनक.म्हणजे आदिवासी, व मुस्लिम इतर समुदायाच्या हिताला दाखविलेली केराची टोपली.ह्या विरोधात आदिवासी समाजसह इतर वर्गातिल लोकांनी देखील हिरीरिने सहभाग नोंदउन आपला निषेध केला.पंचायत समिति कार्यालयात प्रचंड जनसंख्येने लोक उपस्थित होते.प्रशासनाला ह्या प्रकरण अंतर्गत खाते निहाय सखोल चौकशी होऊन संबंधित-जबाबदार अधिकारी-कर्मचारी यांच्या वर कठोर कायदेशीर कारवाई करून खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळउन द्यावा ह्यसाठी चे निवेदन दिले गेले.निवेदन हे मा.,रणजीत तडवी,Adv. मा.रोहित ब्राम्हणे, दादासाहेब सुनील शिंदे पाटिल राष्ट्रीय पिछड़ा(ओबीसी) वर्ग मोर्चा जिलाध्यक्ष सह राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे पदाधिकारी सह,बहुजन मुक्ति पार्टी,बहुजन क्रांति मोर्चा,ILA, सह इतर संघटन चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्तीत होते.
निवेदन देते वेळी पिंपळगाव चे ग्रामस्थ शौकत तडवी, शरीफ तडवी, अशपाक तडवी, सरोज तडवी, करीम तडवी, रफीक तडवी, अस्लम तडवी, शेख रहेमान, जाकीर तडवी, अरशद फारुख, शकील पठाण, मुस्ताक तडवी, मुस्तफा तडवी आदी ग्रामस्थ तथा पदाधिकारी उपस्थित होते