तहसीलदार साहेब असतांना ही रेती तस्करी होते कशी?या प्रश्नांचा उत्तर मिळणार काय?

तहसीलदार साहेब असतांना ही रेती तस्करी होते कशी?या प्रश्नांचा उत्तर मिळणार काय?

तहसीलदार साहेब असतांना ही रेती तस्करी होते कशी?या प्रश्नांचा उत्तर मिळणार काय?

तहसीलदार साहेब असतांना ही रेती तस्करी होते कशी?या प्रश्नांचा उत्तर मिळणार काय?

मनोज गोरे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो.9923358970

कोरपना :- कोरपना चे या पूर्वीचे परिक्षविधीन तहसीलदार, रणजित यादव हे जेव्हा कोरपना येथे कार्यरत होते तेव्हा रेती तस्करांना नाकी नऊ आणले होते आपला एक विशेष दरारा निर्माण करून मोठ्या मोठ्या रेती तस्करांवर कारवाई केली होती मोठे मोठे तस्करांच्या धाबे दणाणले होते रणजित यादव यांनी फार मोठ्या प्रमाणात अपेक्षेपेक्षा ही जास्त महसूल कारवाई च्या माध्यमातून शासनाला मिळवून दिले होते. हे मात्र विशेष पण आता कार्यरत तहसीलदार साहेबांनी रेती तस्करीला हिरवे कंदील? दाखविले असावे अशी उघड चर्चा कोरपना तहसील सह आता तर संपूर्ण चंद्रपूर जिल्हयात होऊ लागली आहे. पोलीस विभाग ही गाढ झोपेत असल्याचे बोलले जात असून दोन गणेश कडून पोलिस विभाग चा माल सूतो अभियान सुरू असल्याने साहेबांचे आशीर्वाद त्यांना मिळाले असावे असे कोरपना परिसरात स्पष्टपणे बोलले जात आहे.

कोरपना तालुक्यात -धुमाकूळ माजवाणाऱ्यानी कोरपना तालुक्यातील घाट पोखरून काढण्याचे काम अती जलद गतीने सुरू केले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही!वास्तविक पाहता घाट चे लिलाव झाले नसतांना एवढ्या मोठ्या प्रमाणात हायवा जे सी बी ट्रॅक्टर वाटेल ते वाहनाने रेती व खनिज ची मोठ्या प्रमाणात होत असलेली अवैध तस्करी कोणाच्या आशीर्वादाने सुरळीत सुरू आहे? याचे उत्तर बुद्धिजीवी वर्गाकडून तर मिळत आहे परंतु संबंधित अधिकारी व कर्मचारी मुंग गिळून का गप्प बसले आहे याचे उत्तर प्रतिउत्तर अजून हि मिळाले नाही हे मात्र न समजण्या पलीकडचे विषय आहे.

झोपणाऱ्याला अगदी सहजपणे उठविता येते परंतु झोपण्याचा सोंग घेणाऱ्याला उठविणे शक्यच नाही हे ही मात्र तेवढेच खरे रेती चा साठा अवैध मार्गाने करीत मोठ्या प्रमाणात रेती ची अवैध तस्करी करून तस्कर आता तस्कर मोठे गब्बर होऊ लागले आहे. एवढेच नव्हे तर महामार्ग चे काम जोमाने सुरू असून मोठ्या प्रमाणात कंपनीला सुद्धा अनधिकृत रित्या खनिज पुरवठा केला जात आहे ही चर्चा सर्वत्र केली जात आहे या बाबतीत सखोल चौकशी झालीच पाहिजे असे ही बोलले जात आहे.

तहसील कर्मचारी व पोलीस मूग गिळून शांततेत बसले आहे. नव्याने आलेले तहसीलदार यांच्या कडून बरंच अपेक्षा अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे या संदर्भात तालुक्यातील नागरिकांनी आपले मत व्यक्त केले. मात्र ठाणेदार आणी तहसीलदार यांच्या आशीर्वादाने? रात्रौलाच नव्हे तर भर दिवसात ही मोठ्या प्रमाणात तस्करी जोमात सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कोरपना तहसील आता रेती तस्करांचे माहेरघर झालेले आहे असे सुद्धा बोलले जात आहे.

पोलीस विभागातील कर्मचारी व अधिकारी रेल्वे प्रमाणे लाल थांबा आशीर्वाद घ्या पिवळा पाहा आम्ही तुमच्या सेवेत व हिरवा जा आमचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहे अश्या प्रमाणे इथला कारभार सुरू आहे अशी चर्चा आता तर संपूर्ण परिसरात होऊ लागली आहे.झोपण्याचा सोंग घेणारे आता तरी जागे होतील का हा प्रश्न अजून ही अनुत्तरीत आहे.आता तरी हिरवा कंदील बंद करा असे बोलण्यात येत असून संबंधित विभागाचे वरिष्ठ यांनी झोपी गेलेल्याना जागी करून त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी व आवश्यक ती कारवाई करावी असे मत बुद्धिजीवी वर्गाकडून व्यक्त केले जात आहे.
संबंधित वरिष्ठ विभागाकडून लवकरच कारवाई चा बडगा उभारला जाणारच असा विश्वास तालुका वासियांनी व्यक्त केला आहे.

कोरपना येथील संबंधित अधिकारी आपली जवाबदारी पार पाडण्यात अयशस्वी ठरले अशी टीका होऊ लागली आहे हे ही मात्र तेवढेच खरे.

जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून योग्य ती कारवाई झालीच पाहिजे असा आग्रह नागरिकांकडून केला जात आहे.

कोरपना तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या कोठोडा घाट, पिपरी घाट, वनोजा घाट, अंतरगाव घाट, इरई घाट, या सर्व घाटा सह अनेक ठिकाणी रात्रौला.10 वाजता पासून तर पहाटे 7 वाजता पर्यंत रोज अवैध चोरटी वाळू वाहतूक सुरू आहे. अद्याप ही घाट लिलाव झाला नसताना बांधकाम साठी वाळू कुठून येतं आहे? या प्रमुख प्रश्नाचे उत्तर मिळणार काय? अवैध वाळू वाहतूक तस्करी कधी थांबणार हा प्रश्न अजुन ही उभा ठाकला आहे?