स्वयंभू सोमेश्वर प्राचीन शिवमंदिर सोनगाव रोहा येथे महाशिवरात्री निमित्त भव्य मिरवणूक….

स्वयंभू सोमेश्वर प्राचीन शिवमंदिर सोनगाव रोहा येथे महाशिवरात्री निमित्त भव्य मिरवणूक....

स्वयंभू सोमेश्वर प्राचीन शिवमंदिर
सोनगाव रोहा येथे महाशिवरात्री निमित्त भव्य मिरवणूक….

स्वयंभू सोमेश्वर प्राचीन शिवमंदिर सोनगाव रोहा येथे महाशिवरात्री निमित्त भव्य मिरवणूक....

✍️सनील इंगावले ✍️
रोहा तालुका प्रतिनिधी
📞99222 07205📞

रोहा :-रोहा शहरापासून अगदीच कुंडलिका नदीच्या तीरापासून सोनगाव नावाचे छोटेसे गाव वसलेले आहे. पूर्वी ही नदी छोट्या कमानीवरून ओलांडून अंदाजे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनगाव गावी जावे लागते . निसर्गरम्य परिसरात असलेल्या या गावाला तिन बाजूने डोंगराने वेढलेले आहे. सोनगाव गावाच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या रांगेवर ऐतिहासिक श्रीमंत अवचितगड किल्ला आपली श्रीमंती टिकवून आहे. पूर्वेला सह्याद्रीची पर्वतरांग व त्यावरील उभा असलेला घेरासुरगड दक्षिणेला बारमाही वाहणारी कुंडलिका नदी…रोहा शहरापासून सोनगाव ला जाण्यासाठी पक्का डांबरी रस्ता असल्याने आपणास रेल्वे क्रॉसिंग करून रोह्याच्या उत्तरेला असलेल्या सोमेश्वर देवस्थानास जाण्यासाठी आपल्याला वाहनाने थेट मंदिर परिसरात पोहचता येते.पुरातन असे श्री सोमेश्वराचे मंदिर स्वयंभू असून भक्तांची नितांत श्रद्धा आहे… पूर्वी भक्कम दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्वार सोनगाव ग्रामस्थांनी…. साली केला असल्याची माहिती मिळते. (त्यापूर्वीची माहिती मिळू शकत नाही) मात्र सोनगाव ग्रामस्थानी पुन्हा एकदा कौलारू असलेल्या सोमेश्वराच्या या शिवालायचे 2015 साली नव्याने RCC मध्ये सुंदर असं बांधकामं केल व मंदिराला सुंदर नक्षीकाम असलेला कळस चढवीला आणि मंदिराचा जीर्णोद्धार केला .सोमेश्वर मंदिराच्या अगदी समोर आई भवानी च मंदिर आहे.. सोमेश्वर मंदिराच्या पश्चिमेस पिंगळसई येथील शिव मंदिर व पूर्वेस मालसई येथील शिव मंदिर आहे, विशेष म्हणजे महादेवाची तिन्ही मंदिरे एका सरळ रेषेत आहेत आणि केंद्रास्थानी स्वयंभू सोमेश्वर आहे.
विस्तीर्ण प्रांगण असलेल्या या मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर मंदिराच्या समोर भव्य ष्टकोनी दीपमाळ असून तिच्यावर एक शिलालेख आहे (काळाच्या ओघात दिसत नाही ) व तिच्या शेजारी कालभैरवआहे.. मंदिरात प्रवेश करायच्या आधी आपलं लक्ष वेधल जात ते मंदिराबाहेर उभ्या असलेल्या नंदी कडे, सोमेश्वर मंदिर किती प्राचीन आणि वैभव संपन्न आहे हे आपल्याला ह्या नंदिकडे पाहिलं कि समजून येतो.. पूर्वी मंदिरात उभा असलेला हा नंदी जीर्ण झाल्याने ग्रामस्थांनी त्याला मंदिराबाहेर जतन करून ठेवला आहे, नंदी भव्य असून नंदीच्या अंगावर शृंखला आहेत व त्याचे दोन्ही कान व शिंगे तुटली आहेत, परंतु उभा आणि एवढा भव्य नंदी आपणास कुठे पहावयास मिळत नाही… मंदिराच्या उजव्या बाजूस तीन समाध्या आहेत ( पहिली समाधी वीरशैव धर्माचे शिवाचार्य यांची असून दुसरी समाधी त्यांच्या शिष्याची आहे व तिसरी समाधी सोनगाव मधील नारायण जंगम यांची असल्याची माहिती मिळते) सोनगाव गावात स्थायिक असलेल्या जंगम घराण्याच्या कुलबांधवांनी त्या बांधल्या असल्याची माहिती मंदिराचे पुजारी चंद्रकांत जंगम देतात.

मंदिराच्या उजव्या बाजूला ऊन वारा पाऊस यांचा सामना करत एक पाषाण मूर्ती सुस्तिथी मध्ये आहे त्या मूर्तीला *भुंडी* (अपरिचित नाव) असे म्हणतात.. ह्या मूर्तिबद्दल एक अख्यायिका सांगितली जाते कि जेंव्हा पाऊस पडत नसेल तेंव्हा निपुत्रिक व्यक्तीने त्या मूर्तीवर दगड ठेवल्याने पाऊस पडतो असं सांगितलं जात.अतिशय सुबक बांधणीचे सभागृह आणि आतमध्ये गाभारा अशी मंदिराची रचना आहे. गाभाऱ्याबाहेर काळ्या पाषाणातील नंदी शिल्प असून नंदी उभा आहे संपूर्ण भारतात उभा नंदी असलेले शिवालय खूप कमी प्रमाणात आहेत. ( शिखर शिंगणापूर येथे 12 उभे नंदी असल्याचे दिसून येतात ). तसेच सांभामंडपात कासव प्रतिमा कोरलेली आहे.सभामंडपात आपल्याला डाव्या बाजूला विद्येची देवता श्रीगणेश, उजव्या बाजूला श्रीविष्णू व श्री मारुतीराया यांच्या सुबक व देखण्या मुर्ती आहेत. तसेच गाभाऱ्याच्या प्रवेश द्वारावर गरुडदेवतेची प्रतिमा कोरलेली आहे.या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यात असलेली भव्य स्वयंभू शिवपिंडी. पिंडीवरील शाळुंखेवर पितळेचा शंभु महादेवाचा मुकुट आणि त्यावर तांब्याची नागफणी आहे. शेजारी भव्य त्रिशूल व त्यावरील रुद्राक्षांच्या माळा भक्ताचे लक्ष वेधून घेतात… शिवलिंगावर अभिषेक व्हावा यासाठी कायम स्वरूपात गळती (मोठा गडू ) अडकवला आहे..शिवपिंडीच्या मागच्या बाजूस पार्वतीमातेची सुंदर मूर्ती आहे..या मंदिरात नित्य पूजारी जंगम आहेत.त्यांच्या मार्फत दररोज सकाळी सात ते दहा या वेळात भाविकांसाठी अभिषेक, पूजा अशी कामे केली जातात.

स्वयंभू सोमेश्वर शिवलयात दर सोमवारी सायं भजन व आरती नित्यानेमाने केली जाते.दरवर्षी माघ कृष्ण तृतीयेला महाशिवरात्रीला येथे मोठा वार्षिक उत्सव साजरा केला जातो व मोठी यात्रा भरते.तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात अभिषेक, पूजा,भजन, कीर्तन, नामजप असे कार्यक्रम असतात. महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी 12.00 राजाधिराज श्री सोमेश्वर महाराज यांचा भव्य पालखी सोहळा सुरु होतो,विशेष म्हणजे परंपरागत पालखी उचलण्याचा मान स्थानिक पोलीस पाटील यांचा असतो. श्री सोमेश्वराच नाव घेताना भक्तांकडून मोठ्या भक्तीभावाने *राजाधिराजा श्री सोमेश्वर महाराज कि जय* असा जयघोष केला जातो.. राजाधिराज सोमेश्वर महाराज आपल्याला घरी येणार म्हणून संपूर्ण गावात सजावट करून रांगोळ्या टाकल्या जातात व गाव सुशोभीत केला जातो.परंपरेपासून पालखी सोनगाव, धामणसई व गावठाण अशा तीन गावात फिरते.दरवर्षी गावात गोकुळाष्टमीला टाळ मृदंगाचा जागर सप्ताहाचे सात दिवस आयोजन केले जाते… गणपती मध्ये भागवत सप्ताह चे आजही अखंड पारायण केले जाते..
भक्तांच्या हाकेला धावणारा व भक्तांचे रक्षण करणाऱ्या राजाधिराज सोमेश्वरावर सोनगाव ग्रामस्थांची व तालुक्यातील भक्तांची नितांत श्रद्धा आहे..