जिल्ह्यातील 2 हजार 704 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते दृरदूष्यप्रणालीद्वारे 14 कामांचे उद्धाटन तर 48 कामांचे भूमिपूजन संपन्न

जिल्ह्यातील 2 हजार 704 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते दृरदूष्यप्रणालीद्वारे 14 कामांचे उद्धाटन तर 48 कामांचे भूमिपूजन संपन्न

जिल्ह्यातील 2 हजार 704 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते
दृरदूष्यप्रणालीद्वारे 14 कामांचे उद्धाटन तर 48 कामांचे भूमिपूजन संपन्न

जिल्ह्यातील 2 हजार 704 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते दृरदूष्यप्रणालीद्वारे 14 कामांचे उद्धाटन तर 48 कामांचे भूमिपूजन संपन्न

✍️विवेक काटोलकर ✍️
माणगांव शहर प्रतिनिधी
📞 77989 23192📞

माणगांव :- रायगड जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 2 हजार 704 कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते दृरदूष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील 14 कामांचे लोकार्पण तर 48 कामांचे भूमिपूजन करण्यात आले.समिती सभागृह विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन येथे आयोजित या कार्यक्रमास उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आ.प्रवीण दरेकर, आ.निरंजन डावखरे (ऑनलाईन) उपस्थित होते. तर कार्यक्रम स्थळी मुख्य अभियंता, सा.बां. प्रादेशिक विभाग, कोकण मुंबई शरद राजभोज आणि अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यातील मंजूरी मिळालेली सर्व कामे उत्कृष्ट व दर्जेदार होतील याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिले पाहिजे. कामांचा दर्जा चांगल्या पध्दतीचा असावा यासासाठी सर्वांनी जागरुक राहिले पाहिजे. रायगड जिल्ह्याचे पर्यटनदृष्टया महत्व लक्षात घेता या जिल्ह्यामध्ये रस्त्यांचे जाळे तयार केले असून रस्त्यांची दर्जोनोत्ती केली आहे. कोकण रेल्वेची सर्व स्थानके ही अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त करण्यात येणार आहेत. गेल्या दीड वर्षात लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार सर्व कामे मंजूर करण्यात आली आहेत.असेही श्री चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या, महामंडळाच्या माध्यमातून कामांना सुरुवात झाली असून गतिमान व दर्जेदार काम होण्यासाठी नियोजनबध्द पध्दतीने पाऊले टाकली आहेत. जिल्ह्यातील होणारी सर्व कामे पारदर्शीपणे होणार आहेत असेही श्री चव्हाण यावेळी म्हणाले.
रायगड जिल्ह्यातील उद्धाटन झालेली 14 कामे कार्यक्रम पुढीलप्रमाणे :- इंदापूर, पाचाड, महाड, करंजाडी, विसापूर, दापोली रस्ता रा.मा. 97 रस्त्यांची सुधारणा करणे. श्रीवर्धन, म्हसळा, लोणेरे, रस्ता रामा 99 कि.मी. रस्त्यांची सुधारणा करणे. पाली पाटणूस रस्ता रा.मा. 94 रस्त्यांची सुधारणा करणे. पोयनाड नागोठणे रस्ता रा.मा. 87 रस्त्यांची दुरुस्ती करणे. प्ररामा-15 ते भावे किये, पदाची, रायाचीकोंड ते प्रजिमा-46 जोड रस्ता प्रजिमा-94रस्त्याची सुधारणा करणे,ता.महाड. आंबेत, बागमांडला रस्ता रा.मा.100 या रस्त्याची सुधारणा करणे, कोन सावळे रस्ता रा.मा.105 कि.मी.1/700 ते 4/200 रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे, ता.पनवेल. उद्धर, कुंभारघर, महागांव, चंदरगाव, हांतोड,गोदाव ते रा.म.मा.548 अ प्रजिमा-40 लांबी मध्ये सुधारणा करणे.ता.सुधागड. जासई न्हावा रस्ता रा.मा. 108 कि.मी. 0/400 मध्ये स्लॅब ड्रेनचे/लहान पुलांचे बांधकाम करणे.ता.उरण. नरवण खुटील मुमुशी रस्ता प्रजिमा-67 या रस्त्यांचे डांबरीकरण व नुतनीकरण करणे,ता.महाड. कोंढवी, इंदापूर रस्ता प्राजिमा 183 व चोळई नदीवर मोठ्या पुलांचे बांधकाम करणे.ता.पोलादपूर. उरण, केगांव रस्ता प्रजिमा-01 वरील कि.मी.1/400 मध्ये स्लॅब ड्रेनची पुर्नबांधणी करणे.ता.उरण. उरण शेवा रस्ता प्रजिमा 03 कि.मी. 0/300 मध्ये स्लॅब ड्रेनची पुर्नबांधणी करणे.ता.उरण. उरण शेवा रस्ता प्रजिमा 03 कि.मी. 1/00 आरसीसी कलर्व्हटची पुर्नबांधणी करणे.ता.उरण
रायगड जिल्ह्यातील भूमिपूजन झालेल्या कामांची यादी पुढीलप्रमाणे- तालुका पनवेल- पनवेल, नेरे, मालडुंगे रस्ता रा.मा. 103 मध्ये सुधारणा करणे. पनवेल नेरे मालडुंगे रस्ता रा.मा. 103 कि.मी. 3/800 मध्ये मोठ्या पुलाचे पुर्नबांधकाम करणे. पनवेल तालुक्यातील कोंड्यांची वाडी येथे गाढी नदीवर मोठ्या पुलांचे बांधकाम करणे. गुलसुंदे कराडे जांभिवली सावणे रस्त्यावर पाताळगंगा नदीवर कि.मी.0/525 येथे मोठ्या पुलांचे बांधकाम करणे.प्र.जि.मा. 89, ता.पनवेल. कोन सावळे रस्ता रा.मा. 105 रस्त्यांचे काँक्रीटकरण करणे.ता.कर्जत:-उक्रुळ, चांधई, कडाव, तांबस रस्ता, प्रजिमा-17 सा.क्र. 25/200 वर पुलाचे बांधकाम करणे. कशेळे नांदगांव सेक्श्न ते भिमाशंकर पायथ्यापर्यंत रस्त्याची सुधारणा करणे (रुंदीकरण व मजबूतीकरण).
ता.उरण:-चिरनेर आवरे रस्ता प्रजिमा-06 कि.मी. 0/000 ते 5/300 मध्ये स्लॅब ड्रेनची पुर्नबांधणी करणे. जासई न्हावा रस्ता रा.मा. 108 या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे. गव्हाणफाटा चिरनेर साई खारपाडा सावरोली रस्ता रामा-104 सा.क्र.5/100 व सा.क्र.9/800 येथे साकवाचे बांधकाम करणे. जासई न्हावा रस्ता रामा. 108 कि.मी.0/800 ते 1/900 व 2/050 ते 3/073 मध्ये काँक्रीटीकरण करणे.
ता.खालापूर:-बुरुजवाडी काटवन या रस्त्याची सुधारणा करणे. पोखरवाडी सोंडेवाडी रस्त्याची सुधारणा करणे.3.एनएच-4 ते हातनोली गणेश घाट पर्यंत रस्ता तयार करणे.ता.महाड:- महाड येथील वर्ग-1 अधिकारी/कर्मचारी निवासी इमारतीचे बांधकाम करणे. महाड येथील वर्ग-2,3,4 अधिकारी/कर्मचारी निवासी इमारतीचे बांधकाम करणे. .महाड तालुक्यातील दासगांव गोठे येथे सावित्री नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम जोडरस्त्यासह करणे. महाड तालुक्यातील मांदाड तळा इंदापूर निजामपूर महाड विसापूर दापोली रस्ता रा.मा.97 कि.मी.92/200 वरील दादली पुलाचे बांधकाम करणे. ग्रामा 164 वर नाते येथे गांधारी नदीवर बंधाऱ्यासह पुलाचे बांधकाम करणे.रावढळ वामने सापे नडगांव रस्त्याचे नुतनीकरण करणे. दासगांव, नवीन विश्रामगृहाचे बांधकाम करणे. रायगड जिल्हयातील इंदापूर पाचाड महाड करंजाडी विसापूर दापोली रस्ता रा.मा. 97 रस्त्याची सुधारणा करणे.ता.पोलादपूर:- बोरज देवळे हळहुले रस्ता प्रजिमा-125 वरील सावित्री नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे. कापडे पितळवाडी बोरघर कामाचे रस्ता प्रजिमा 101 कि.मी. 5/100 वरील सावित्री नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे. कापडे पितळवाडी बोरघर कामथे रस्ता प्रजिमा 101 कि.मी. 5/500 वरील सावित्री नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे. नवीन विश्रामगृहाचे बांधकाम करणे.
तालुका श्रीवर्धन:- म्हसळा कॉजरी रस्ता प्रजिमा-73 या रस्त्याची सुधारणा करणे. (3.75 मी.चं 5.50 मी.)मध्ये रुंदीकरण करणे. तळवडी,म्हसळा व श्रीवर्धन येथे नवीन विश्रामगृहाचे बांधकाम करणे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन म्हसळा लोणेरे रस्ता रा.मा. 99(म्हसळा बाह्यवळण रस्ता 0/00 ते 3/500 समाविष्ट्)रस्ता सुधारणा करणे.आंबेत बांगमांडला रस्ता सुधारणा करणे.तालुका- रोहा:- वाकण रोहा खारी,खाजणी रा.मा. 93 या रस्त्याची सुधारणा करणे. रा.मा. 93 ते भिसे राजेवाडी मार्ग ग्रा.मा.30 या रस्त्याची सुधारणा करणे. रा.मा. 93 ते पाले वरवडे मार्ग ग्रा.मा. 144 या रस्त्याची सुधारणा करणे. चिंचवली तर्फे आताणे ते कांदळे बेलपाडा रस्ता तयार करणे. ग्रा.मा. 162. गौळवाडी नेहरुनगर ते प्रजिमा-5 ग्रामीण मार्ग-64 या रस्त्याची सुधारणा करणे.तालुका माणगांव:-माणगांव व तळा जि.रायगड येथे नवीन विश्रामगृहाचे बांधकाम करणे.
तालुका- सुधागड पाली:-उद्धर कुंभारघर महागांव चंदरगांव हातोंड गोंदाव ते रा.मा. मा.548 अ. रस्ता प्रजिमा-40 कि.मी. 20/100 येथे स्लॅब ड्रेनचे बांधकाम करणे. आपटवणे ते आपटवणे आदिवासी वाडी रस्त्याचे बांधकाम करणे.
तालुका-अलिबाग:-अलिबाग तालुक्यातील अलिबाग रेवस (चेंढरे बाह्यवळण) रस्त्याची सुधारणा करणे,प्र.रा.मा.4. अलिबाग बाह्यवळण रस्ता प्र.रा.मा. चा भाग कि.मी. 0/00 ते 0/700 मध्ये रस्त्यालगत गटाराचे बांधकाम करणे. व अस्तित्वातील मोरीची पुर्नबांधणी करणे. ताडवागळे कोळघर ठाकूरवाडी भोपोळी रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे. ग्रा.मा. 102 चौल थेरोंडा रस्ता ग्रा.मा.17 (पिरांचे देऊळ ते आगळयाचीवाडी पर्यंत व अप्पा चौक) पर्यंतचा रस्ता साकव बांधकामासह रस्त्याची सुधारणा करणे.तालुका-मुरुड:-उसरोली वलवटी रस्ता इजिमा-114 वर उसरोली कि.मी.3/200 येथे लहान पुलाची पुर्नबांधणी करणे.ल साळाव तळेखार रस्ता रा.मा.92कि.मी. 0/00 ते 1/500 कि.मी. 2/500 ते 6/00 कि.मी.10/00 ते 13/00 मधील रस्त्याची सुधारण करणे व कि.मी.12/900 मधील स्लॅबड्रेनची पुर्नबांधणी करणे.