दादर सागरी पोलीस ठाणे नुतन इमारतीचे भूमिपूजन संपन्न……
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :-पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस ठाणे नुतन इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी आ.रविंद्र पाटील, विशेष पोलीस महानिरिक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अधीक्षक अभियंता अनिता परदेशी यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना पालकमंत्री श्री सामंत म्हणाले पोलीस विभाग अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवतांना नेहमी सर्वोत्तम कामगिरी करून आपली प्रतिमा उंचावावी. सागरी सुरक्षा ही अतिशय महत्वाची असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनं ही स्मार्ट पोलीस स्टेशन असून त्याचा आदर्श इतर जिल्ह्यानी घ्यावा असेही पालकमंत्री श्री सामंत यांनी यावेळी सांगितले.
रायगड जिल्ह्यातील प्रकल्पासाठी भूसंपदान करताना स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असेही श्री सामंत यांनी यावेळी सांगितले.आ. रवी पाटील यांनी दादर सागरी पोलीस स्टेशन होते आहे ही खूप महत्वाची बाब असल्याचे यावेळी सांगितले.विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन इमारतीसाठी तसेच अत्यावश्यक साधन सामुग्री साठी निधी उपलब्ध होत असल्याचे सांगून सागरी सुरक्षेसाठी रायगड पोलीस दल कटीबद्ध आहे असे सांगितले.मुंबई गोवा महामार्गवर अपघात दूत म्हणून कार्य केलेले तसेच महिला पोलीस पाटील यांचा गौरव पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.