ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत अलिबाग मुरूडच्या विद्यार्थ्यांचे यश

ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत अलिबाग मुरूडच्या विद्यार्थ्यांचे यश
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- पनवेल ( तारा ) येथे झालेल्या ५वी सोके कप ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिप २०२५ या स्पर्धेत अलिबाग व मुरूडच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रचे नेतृत्व करून ०३ सुवर्ण, ०६ रौप्य व ०८ कांस्य एकूण १७ पदके पटकावत दमदार कामगिरी केल्याने सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. ही स्पर्धा गोशिन रियू कराटे-डो असोसिएशन इंडिया व सिहान. राजू कोहली यांच्या तर्फे आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, दमण, गुजरात, मध्य प्रदेश, इत्यादी राज्यांनी सहभाग घेतला होता. त्याच प्रमाणे वयोगट वर्ष ०५ ते १७ , १८ वर्षा वरील होते. काता व कुमिते अशा दोन इव्हेंट मध्ये या स्पर्धेत २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांची निवड केरळ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय एशियन लेवल कराटे चॅम्पियनशिप या स्पर्धेसाठी झाली आहे.

यामध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग व मुरुड तालुक्यातून विद्यार्थ्यांनी ०३ सुवर्ण, ०६ रौप्य व ०८ कास्य पदके अशी एकूण १७ पदके पटकावत दमदार कामगिरी केली. त्याचप्रमाणे आपल्या नावे संघ चषक (टीम ट्रॉफी) महाराष्ट्र संघाने आपल्या नावे केले.

या स्पर्धेमध्ये उत्कृष्टरित्या कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांत
त्रिशूल पराग घरत.( पालव ) २ सुवर्ण पदक,चरण मनोज हरे. ( साखर आक्षी ) १ सुवर्ण,१ कास्य पदक, मेधांश मनीष पाटील.( सहाण ) ०२ रौप्य पदक,आराध्य स्वप्निल पाटील.( नागाव ) ०२ कांस्य पदक,अर्चित कपिल वैद्य.( नागाव ) ०२ रौप्य पदक,दूर्वा निलेश नाईक.( आक्षी ) ०२ रौप्य पदक,आर्यन विजय वाघमारे. ( नागाव ) ०१ कास्य पदक,रेयांश राहुल नाईक.( नागाव ) ०१ कास्य पदक,अर्णव चंद्रकांत गिरी.( रायवाडी नागाव ) ०१ कास्य पदक,दुर्वेश ब्रिजेश धांडूरे. ( नागाव ) ०१ कास्य पदक,अर्चित श्रीकांत नांगरे. ( नागाव ) ०१ कास्य पदक.या सर्व
विद्यार्थ्यांचीआंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड झालेली आहे. यशस्वी खेळाडू हे ‘ इंडियन ओकिनावा शोरीन रियू क्युडोकान कराटे-डो इंडिया ‘ या संस्थेअंतर्गत सातत्याने सराव करीत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षक सिहान.अरुण बोडके सर ( मुख्य प्रशिक्षक – भारत ) तसेच रेंशी. अरविंद गजानन भोपी सर ( मुख्य प्रशिक्षक – रायगड ) सेंसाय.प्रसाद प्र.चौलकर ( नवी मुंबई ) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सेंपाय – राधा संदीप ढापरे, सेंपाय – अनुश्री अरविंद भोपी, आणि सेंपाय- वेद संजय पाटील यांचे देखील सहकार्य लाभले. सर्व विजेत्या खेळाडूंचे शाळेचे संचालक, मुख्याध्यापक, कर्मचारी तसेच पालक वर्गाने कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.