दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा – पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे आदेश

दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा – पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे आदेश

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो.8999904994

गडचिरोली : पोलीस अधीक्षक कार्यालयात मुक्तिपथ अभियान व पोलीस विभागाच्या समन्वयातून होणाऱ्या कामाची आढावा बैठक शुक्रवारी संपन्न झाली. १२ वाजता सुरू झालेली बैठक १.३० वाजता संपली. बैठकीला पोलीस अधीक्षक निलोत्पल, मुक्तिपथचे सहसंचालक संतोष सावळकर, दारूबंदी पथकाचे प्रमुख अरुण फेगडे तसेच सर्व तालुक्याचे पोलीस निरीक्षक व १२ हि तालुक्याचे मुक्तिपथचे तालुका संघटक उपस्थिती होते.

प्रत्येक तालुक्यात दारूविक्री बंदी कारवाईची स्थिती काय आहे. गावात बंदीसाठी पोलिस विभागाचे कुठे सहकार्य आवश्यक आहे याची मांडणी मुक्तिपथ तालुका संघटकाने बैठकीत केली. तसेच होलसेल पुरवठा करणारे, गावाला त्रासदायक असणारे दारू विक्रेते कोण आहे. पोलिस निरीक्षकांनी काय कारवाई केली, याबाबत पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी सविस्तर आढावा घेत, कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्रासदायक, होलसेल व वारंवार कारवाई होऊन दारू विक्री करतात त्यांचे तडीपार साठी कारवाई केली पाहिजे प्रस्ताव केले पाहिजे. तसेच आवश्यक ठिकाणी अधिक पोलिस संख्याबळ वापरुन व नियोजन करून कारवाई करावी. विशिष्ट कलम लावून कारवाई करावी. असे विविध अंगी व परिणाम घडून येईल असे आदेश यावेळी पोलिस अधीक्षक यांनी दिले. काही तालुक्यातील शहराच्या ठिकाणी लपून छपून तर काही ठिकाणी मोकळेपणे अवैध दारू विक्री होते अशा ठिकाणी विक्री बंद करण्यासाठी संबधित पोलिस स्टेशन द्वारे वारंवार व सातत्याने कारवाई करावी, सदर ठिकाणी असलेले साहित्य जप्त करावे, विक्रेत्याला पोलिस स्टेशनला हजर करावे, कारवाईचे अहवाल सादर करावे, अशा सूचना उपस्थित सर्व पोलिस निरीक्षकांना पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी दिल्या. तसेच लोकांमध्ये दारूची मागणी कमी झाली पाहिजे तरच पुरवठा कमी होईल यासाठी मुक्तिपथने अधिक प्रयत्न केले पाहिजे असेही पोलिस अधीक्षक यांनी यावेळी संगितले.

जे गावच्या गाव पूर्णत: दारू विक्री मध्ये सहभागी आहे व ज्यामुळे आजूबाजूचे १५ ते २० गावावर परिणाम होतो. अशा गावात, कारवाई सोबतच इतर सुधार कार्यक्रम, युवकांना रोजगार कौशल्य प्रशिक्षण देता येईल का यावर विचारविनिमय करण्यात आला. यासोबतच पोलिस विभाग व मुक्तिपथच्या समन्वयातून तालुक्यातील किती गावात सध्या दारू विक्री बंद आहे याची मुक्तिपथद्वारा मांडणी करताना पोलिस प्रशासनाद्वारे काही तालुक्यात उल्लेखनीय कामे दारूविक्रीबंदीसाठी सुरू असल्याचे सुद्धा मुक्तिपथचे सहसंचालक संतोष सावळकर यांनी मांडले व इतर ठिकाणी दारू विक्रीबंदी साठी सहकारी अपेक्षित आहे, अशी मांडणी केली व समन्वय बैठकीसाठी आभार मानले. पुढील आढावा बैठक लवकरच घेतली जाईल असे पोलीस अधीक्षकांनी सांगतिले.