गरोदर पत्नीचा पोटाला बांधला दगड टाकले तलावात. पत्नीचा तळफळुन मृत्यु.

56

✒अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी ✒
अहमदनगर,दि.7एप्रिल:- जिल्हातील पारनेर तालुक्यातुन एक मन हेलावुण सोडणारी खळबळजनक बातमी समोर आली आहे.पत्नीचा चारित्र्यावर संशय घेउन नव-याने आपल्या बायकोची हत्या केल्याची घटना पारनेर तालुक्यातील वाघवाडी येथे घडली आहे. मृतक नंदा पोपट जाधव असे महिलेचे नाव आहे. तर आरोपी पती पोपट जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार पत्नीवर संशय घेउन स्वताःच्या पतीने पत्नीच्या पोटाला दगड बांधून तिला तलावात टाकून तिची हत्या केला. चार वर्षांपूर्वी मृतक नंदा यांचा पोपट जाधव याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर अपत्य होत नसल्याने आरोपी पोपट जाधव पत्नी नंदा हिला नेहमी त्रास देत होता.

गेल्या पाच महिन्यांपासून नंदा जाधव गरोदर होती. ती गरोदर असल्याचे समजल्यानंतर पती पोपट हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणातून 30 मार्च रोजी नंदा जाधव हिच्या पोटाला दगड बांधून तलावात टाकून दिले होते. त्यानंतर रविवारी ही घटना उघडकीस आली. आरोपी पोपट जाधव घटनेनंतर फरार झाला होता. पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली. त्याने हत्येची कबुली दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक घनशाम बळप करत आहेत.