शीव कोळीवाडा परिसरात शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते भिडले, आमदार सेल्वन यांची पोलिसांना धक्काबुक्की.

✒दयानंद सावंत प्रतिनिधी✒
मुंबई,दि.7:- येथील शीव कोळीवाडा येथे कोकरी आगार क्षेत्रात राजकिय पक्षाचा झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन राजकिय पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे काही काळ या परीसरात तनावाचे वातावरण निर्माण झाले होते.

प्राप्त माहितीनुसार मुंबई उपनगर शीव कोळीवाडा येथील आमदार तामिल सेल्वन यांनी आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या भारतीय जनता पक्षाचे 17 ठिकाणी पक्षाचा झेंडा लावण्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्यानुसार त्यांनी या भागात झेंडे लावले. पण कोकरी आगार येथे त्यांनी लावलेल्या झेंडय़ाला शिवसैनिकांनी विरोध केला. त्याठिकाणी शिवसेनेचा झेंडा असून आजुबाजूला दुसऱया पक्षाचा झेंडा नको, असे म्हणत शिवसैनिकांनी झेंडा लावण्यास विरोध करून तेथे लावलेला झेंडा काढला. हा प्रकार कळताच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि वाद चिघळला.

शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या वादामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने प्रकरण मिटविण्यासाठी स्थानिक पोलीस घटनास्थळी आले. मात्र भाजपचे आमदार तामिल सेल्वन यांनी पोलिसांनाच धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. प्रकरण आणखी चिघळू नये यासाठी उपायुक्त, अपर पोलीस आयुक्तांनी पोलीस ठाण्यात येऊन दोन्ही पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परिणामी सायंकाळी सुरू झालेल्या या वादावर रात्री उशिरा पडदा पडल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here