मुंबईच्या अंधेरी परीसरात धावत्या रिक्षामध्ये महिलेचा विनयभंग, दोघांना अटक.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई,दि.7 एप्रिल:- मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात महिला अत्याचार आणि विनयभंगाचे प्रमाण वाढले असल्याचे माघिल अनेक घटने वरुन समोर येत आहे. मुंबईच्या अंधेरी परीसरात धावत्या रिक्षामध्ये महिलेचा विनयभंग झाल्याचा घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. धावत्या रिक्षात विनयभंग करणा-या दोघांना अंधेरी पोलिसांनी अटक करुन बेळ्या ठोकल्या आहे. अनिकेत जैस्वाल आणि सूरजकुमार राजभर अशी त्या आरोपीची नावे आहेत.

तक्रारदार पिढीत महिलेने गुंदवली परीसरातुन मालाड येथे जाण्याकरीता शेअरिंगची रिक्षा पकडली होती. गुंदवली ते मालाड प्रवासादरम्यान सूरजने त्यानंतर अनिकेतने महिलेशी नकोसे चाळे केले. त्यानंतर महिलेने अंधेरी पोलीस ठाणे गाठून घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. अंधेरी पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त डॉ. महेश रेड्डी यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक विजय बेळगे यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ, संखे, चव्हाण, पाटील, घरात, बाबर, राठोड, जाधव यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी पश्चिम द्रुतगती महामार्ग परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यावरून पोलिसांनी आज अनिकेत आणि सूरजला ताब्यात घेतले आहे. बुधवारी या दोन आरोपीना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here