काय आहे किरीट सोमय्यांनी केलेला आयएनएस विक्रांत घोटाळा ? संजय राऊतांनी केला होता आरोप

63

भारताची पहिली युद्धनौका आयएनएस विक्रांत या जहाजाच्या देखभालीसाठी किरीट सौमय्या यांनी नागरिकांकडून देणगी खातर जमा केलेले ५८ करोड हडपले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता

काय आहे किरीट सोमय्यांनी केलेला आयएनएस विक्रांत घोटाळा ? संजय राऊतांनी केला होता आरोप

सिद्धांत
७ एप्रिल, मुंबई: आयएनएस विक्रांत हि युद्धनौका १९६१ साली दाखल झाली होती. भारत -पाकिस्तनामध्ये १९७२ साली झालेल्या युद्धामध्ये आयएनएस विक्रांतने मोठी भूमिका बजावली होती. पुढे १९९७ हि युद्धनौका सैन्यातून निवृत्त करण्यात आली. त्यानंतर या बलाढ्य नौकेची देखभाल करणे खर्चिक आणि गुंतागुतीचे काम बनले होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने यासाठी असमर्थता दाखवली होती.

यादरम्यान आयएनएस विक्रांत युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करावे अशी नागरिकांकडून मागणी होती. यावेळी भाजपचे किरीट सोमय्यां यांनी खास मोहीम राबवून आयएनएसच्या देखभालीसाठी नागरिकांकडून देणगी रक्कम जमा केली होती. ह्या मोंहीमेअंतर्गत किरीट सोमय्यानी जवळपास ५७ कोटींची रक्कम जमा केली होती. हि रक्कम प्रशासनाकडे सुपूर्त करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे सुपूर्त करणे आवश्यक होते. परंतु असे न करता किरीट सोमय्यानी हे पैसे हडपले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

याबाबत अधिक माहिती देताना संजय राऊतांनी सांगितले कि,आरटीआय कार्यकर्ते वीरेंद्र उपाध्ये यांनी आयएनएस विक्रांतबाबतची सविस्तर माहिती राज्यपालाच्या कार्यालयातून मागवली. परंतु यामध्ये किरीट सोमय्यानी असा कोणत्याही प्रकारचा निधी राज्यपालांकडे जमा केला नसल्याची माहिती देण्यात आली. या पैशांचा वापर किरीट सोमय्यानी आपल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि आपल्या मुलाच्या कंपनीत गुंतवण्यासाठी केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

 

हे आपण वाचलंत का ?

 

देशाच्या संरक्षण सारख्या संवेदनशील मुद्द्यावरून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या किरीट सोमय्यांविरुद्ध देशद्रोहाचा आरोप लागू शकतो. तसेच या घोटाळ्याची सीबीआय, ईडी कडून चौकशी व्हावी अशी मागणीही संजय राऊतांनी यावेळी केली.