कोजबी (चक)येथील सरस्वती विद्यालयात संस्थाध्यक्ष स्व.इंजि. किशोर बारापात्रे यांची जयंती
क्षयरोग मार्गदर्शन शिबिर व पत्रकारांचा सत्कार
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभीड -तालुक्यातील कोजबी(चक) येथील सरस्वती विद्यालयात जनकल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था नवरगावतर्फे संस्थापक स्व.इंजि. किशोर बारापात्रे यांच्या जयंतीनिमित्त क्षयरोग मार्गदर्शन शिबीर तथा पत्रकारांच्या सत्कारांचा कार्यक्रम बुधवारी साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उदघाट्न संस्थेचे अध्यक्ष विजय बारापात्रे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव मनीषा बारापात्रे यांची उपस्थिती होती.तर प्रमुख अतिथी म्हणून संस्था सदस्य डाॅ. सुधाकर नवलाखे,रमेश मस्के, संकेत बारापात्रे, मुख्याध्यापक दीपक बोकडे, मार्गदर्शक प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. स्वप्नील कामडी,आरोग्यसेविका प्रतिभा भाकरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने झाली. याप्रसंगी स्व.इंजी. किशोर बारापात्रे यांच्या जयंतीनिमित्य त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून तळोधी पत्रकार संघातील काही कार्यशील अशा उल्लेखनीय पत्रकारांचा शाल-श्रीफळ, डायरी-पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नागभिड तालुका पञकार संघ र,नं,9419 महा 461संलग्ल यामध्ये तळोधी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश बारसागडे,सचिव भोजराज नवघडे,सहसचिव तुलोपचंद गेडाम,सदस्य सुभाष गजबे,योगेश्वर शेंडे यांचा समावेश आहे.याप्रसंगी ‘पत्रकारिता आणि सामाजिक योगदान’ या विषयावर मार्गदर्शन करताना राजेश बारसागडे म्हणाले की,पत्रकार हा समाजाचा आरसा असतो समाजातील चांगल्या वाईट घटनांचा वृत्तांत तो वृत्तपत्रातून समजासमोर ठेवत असतो.जिथे उणीव,अभाव,
असंतोष आदी समस्या आहेत. तिथला मजकूर तो हेरत असतो. आणि बातमीत त्याला नवे वळण देत असतो.त्याचप्रमाणे जिथे सुंदरता,सकारात्मकता,
विकासशीलता,समाजपयोगी कार्य आहेत. त्यांचा सुद्धा तो बातमीच्या रूपातून उदोउदो करीत असतो.म्हणून इंटरनेटच्या युगातही वृत्तपत्राचे महत्व आणि विश्वासार्हता अजूनही शाबूत राहिली आहे.मात्र काही अपवादात्मक वार्ताहरांनी आपली प्रतिमा मलिन केल्याने पत्रकारांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.अशा लोकांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.असे योग्य मार्गदर्शन केले. सुभाष गजबे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत उद्बोदन केले. यावेळी ‘शयरोग’ या विषयावर डॉ. स्वप्नील कामडी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकेत बारापात्रे यांनी केले. संचालन सहायक शिक्षक सुरेश खोब्रागडे यांनी केले तर आभार सहायक शिक्षक सुरेश बोरकर यांनी मानले.