मौजा जांब येथे २ दिवसांचे बाळ सोडले बेवारस, बाळाच्या पायातील पट्टीवर लक्ष्मी राजपूत असे नाव

 

मौजा जांब येथे २ दिवसांचे बाळ सोडले बेवारस, बाळाच्या पायातील पट्टीवर लक्ष्मी राजपूत असे नाव

मौजा जांब येथे २ ते ३ दिवशाचं लहान पुरुष बाळ अज्ञात इसमाने सोडले बेवारस सामान्य रुग्णालय भंडारा येथे केले भरती, बाळ जिवंत आणि सुखरूप आहे सापडलेल्या बाळाच्या पायात होती बैंडेज पट्टी, त्या पट्टीमध्ये लक्ष्मी राजपूत असे नाव लिहले होते. हे आढळले

✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838

मोहाडी :- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात मौजा जांब ( कांन्द्री ) येथे दिनांक ५ एप्रिल २०२२ रोज मंगळवार रोजी सकाळी ( पहाटे ) ४:३० वा. चे दरम्यान जांब गावात एक पुरुष जातीचा अंदाजे वय २ ते ३ दिवशाचा लहान पुरुष बाळ कोणीतरी अज्ञात इसमाने बेवारस स्थितीत सोडून दिले होते. हि घटना पोलीस स्टेशन आंधळगाव, ता-मोहाडी, जिल्हा भंडारा येथील पोलीसांचे फिरते पथक म्हणजेच पेट्रोलींग गाडी फिरत असतांनी हे बाळ निदर्शनास आले. तो बाळ पकडून आंधळगाव पोलीसांनी ताब्यात घेतले व त्या बाळाला ग्रामिण रुग्णालय भंडारा जिल्हा येथे दाखल (भरती ) केले. त्यावेळी बाळ हे जिवंत अवस्थेत आहे असे डॉक्टरांनी सांगितले. जेव्हा तो बाळ मिळून आले तेव्हा त्याच्या पायात एक बैंडेज पट्टी होती व त्या पट्टी मध्ये लक्ष्मी राजपूत असे नाव लिहिले होते. यावरुण त्या बाळाचे डिलिव्हरी एखादया चांगल्या दवाखाण्यात झालेली आहे याबाबत पोलीस स्टेशन आंधळगाव अप क ५४/२०२२ कलम ३१७ भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कुनाला काही माहीती असल्यास तात्काळ खालील नंबरवर संपर्क करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स.पो.नि. सुरेश मट्टामी ठाणेदार पोलीस स्टेशन आंधळगाव मोबाईल नंबर ७३५०९६८१००, व तपासी अंमलदार नितीन तळवेकर पोलीस हवालदार मोबाईल नंबर ९२८४९३७१८७ या नंबरवर कळवावे अशी अपेक्षा स.पो.नि सुरेश मट्टामी ठानेदार साहेब यांनी व्यक्त केली आहे. माहीती सांगणाऱ्या व्यक्तीस योग्य बक्षिस पण देण्यात येईल अशी घोषणा देखील केली आहे.