किरीट सोमय्या निल सोमय्या व साथीदार यांच्यावर ट्राॅम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

किरीट सोमय्या निल सोमय्या व साथीदार यांच्यावर ट्राॅम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

किरीट सोमय्या निल सोमय्या व साथीदार यांच्यावर ट्राॅम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

मुंबई:- दि.७ एप्रिल २०२२ रोजी फिर्यादी श्री. बबन भीमराव भोसले वय ५३ वर्षे माजी सैनिक यांच्या फिर्यादीवरून ईशान्य मुंबईचे माजी खासदार किरीट सोमय्या, नील सोमय्या व त्यांच्या इतर साथीदारांनी आपापसात संगणमत करून “आय एन एस”विक्रांत”या लढाऊ जहाजाच्या डागडुजी करिता सण 2013-2014 मध्ये चर्चगेट, भांडुप, मुलुंड, बांद्रा, अंधेरी, व मुंबई शहराच्या वेगवेगळ्या परिसरातून फिर्यादी व इतर लोकांचा विश्वास संपादन करून अंदाजे 57 कोटी रुपये व त्यापेक्षा जास्त निधी फिर्यादी व लोकांकडून गोळा करून सदरची रक्कम ही माननीय. राज्यपाल यांचे कार्यालय मुंबई येथे जमा न करता त्याचा स्वतःच्या फायद्याकरिता अपहार करून फिर्यादी व इतर लोकांची फसवणूक केली म्हणून ट्रॉम्बे पोलीस ठाणे गु.र.क्र.१४९/२०२२ कलम ४२०, ४०६, ३४, भा.द.वि. अन्वये माजी खासदार किरीट सोमय्या नील सोमय्या व त्यांचे इतर साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.