विद्यानिकेतन महाविद्यालय हिंगणघाट यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित सात दिवसीय विषेश श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न.

✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी:8806839078

हिंगणघाट: येथील स्थानिक विद्यानिकेतन महाविद्यालय यांच्या वतीने व राष्ट्रीय सेवा योजनच्या संयुक्त विद्यमाने उच्च प्राथमिक शाळा येनोरा येथे विषेश श्रमसंस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न.
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्व जाणिव निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांमध्ये दडुन असलेल्या कलागुणांना वाव मिळावी आणि ग्रामीण भागातील लोकांमध्ये काहितरी प्रबोधन व्हावे व लोकांनी विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू करावी, यासाठी विद्यानिकेतन महाविद्यालय हिंगणघाट यांचे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिर तालुक्यातील येनोरा येथे आयोजित केले आहे.
या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वय डॉ. राजू निखाडे सर रा. सुं. बिडकर महविद्यालय हिंगणघाट , योगेश बोंडे सरपंच येनोरा हे होते. यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, व प्रास्ताविकानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.व यानंतर आभार प्रदर्शनाच करून कार्यक्रमाची सांगता केली.
यावेळी महविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.