निवेदिता परीवारातर्फे दिपक जोशी यांचा सत्कार

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

नवरगाव, 7 एप्रिल:नवरगाव येथील निवेदिता महिला क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक दिपक जोशी यांचा सेवानिवृत्ती प्रित्यर्थ निवेदिता संस्थेचे संचालक, कर्मचारी व संकलक यांच्या तर्फे सत्कार सोहळा स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न झाला. दिपक जोशी हे श्री ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव येथे कर्मचारी म्हणून कार्यरत होते. भारत विद्यालय नवरगाव येथून ते वयाची ५८ वर्ष पूर्ण करून नुकतेच सेवानिवृत्त झाले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवरगाव नगर कार्यवाह होते. सध्या विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा समरसता प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

सन २००१ मध्ये त्यांनी निवेदिता संस्थेची स्थापना केली. आज संस्थेच्या ९ शाखा असून नागपूर विभाग कार्यक्षेत्रात संस्था पोहचली आहे. विदर्भात महिला सोसायटी म्हणून नावलौकिक मिळविलेला आहे. संस्थेचे संस्थापक या नात्याने संचालक, कर्मचारी व संकलकांनी त्यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित केला. त्यांच्या सत्कार प्रसंगी विजय मुळे, दिपक कवासे, अरविंद राऊत, पांडरंग वाघमारे, संचालिका वर्षा गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून दिपक जोशी यांच्या कार्याचा गौरव केला. ते उत्तम संघटक, नियोजक, तप्तर व्यक्ती व सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहेत असे विचार सर्वांनी व्यक्त केले.

समारंभाचे अध्यक्ष विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री तथा धनश्री पतसंस्थेचे मुख्य प्रवर्तक मनोज हंबर्डे होते. प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. सुरेशराव बाकरे होते. मंचावर संस्थेच्या अध्यक्षा व उपाध्यक्षा उपस्थित होत्या. सत्काराला उत्तर देताना दीपक जोशी यांनी ग्राहक सेवा, संस्थेची प्रगती, समाजहित, राष्ट्रहित हेच आपले ध्येय असावे हा संदेश दिला. विश्व हिंदू परिषदेच्या कार्य वाढीसाठी सर्वांनी तन – मन – धन पूर्वक कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांना अधिकाधिक तप्तर सेवा ग्राहकांना देऊन शाखेची प्रगती कशी होईल याचा विचार करावा तसेच समाज व राष्ट्र कार्यात सहभाग घ्यावा अशी सर्वांना विनंती केली. संचालन भगवान नारदेलवार तर आभार प्रज्ञा कवासे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here