संत आशाताईस स्मृतिदिनी निरंकारी सत्संगाने अभिवादन, मोठ्याप्रमाणात भक्तभाविकांची उपस्थिती

कृष्णकुमार निकोडे 

मो.न: ७७७५०४१०८६

गडचिरोली: दि.७ एप्रिल २०२३: स्थानिक रामनगर वॉर्डातील प.पू. गुरुदेव हरदेव कृपानिवास येथे संत आशाताई निकोडे यांचा दुसरा स्मृतिदिन आयोजित केला होता. संत निरंकारी सत्संगाच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करून स्मृतिदिन साजरा करण्यात आला. त्यात गावोगावचे चाहते भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

     गडचिरोलीच्या रामनगर वॉर्डात दरवर्षीप्रमाणे काल दि.६ एप्रिल रोजी सेवाभावी संत आशाताई कृष्णकुमार निकोडे यांचे पुण्यस्मरण करण्यात आले. या त्यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी स्थानिक संत निरंकारी बांधवांनी सत्संगाचे आयोजन केले होते. ब्रँचमुखी महात्मा गजानन तुनकलवार यांचे प्रमुख मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली सत्संग व अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडला. उपस्थित कवी व वक्त्यांनी भक्तिगीत व विचारातून सद्गुरु, प्रभू परमात्मा परमेश्वर यांचे गुणगान करून संत आशाताईच्या जीवनावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय मार्गदर्शनातून महात्मा गजाननराव तुनकलवार यांनी सांगितले, की संत आशाताई नेहमी सेवाव्रती जीवन जगल्या. ती प्रेरणा सर्वांनी घेतली पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले. सत्संग व अभिवादनानंतर उपस्थित भक्तमंडळींनी सहभोजनाचा आस्वाद घेतला.

    या वेळी पुष्पाताई तुनकलवार, मधुकर गेडाम, रेखाताई अंड्रसकर, भानारकर परिवार, खोब्रागडे परिवार, दशरथ निंबोरकर, दिलीप पेंदोरकर परिवार, हिमांशू लेनगुरे सावली, नासिकेत गुरनूले देलोडा बुज, गोलू गावतूरे चिचोली, विनोद मोहूर्ले जेप्रा, सेवादल इंचार्ज राजेश गुंडेवार, सेवादल शिक्षक वसंत मेडेवार परिवार, कुसुमताई तुनकलवार, सुमंत चोपकार परिवार, शामराव कुकडकर परिवार, दुधराम महागणकर व सोबती, ब्रह्मानंद उईके परिवार आदी उपस्थित होते. तर भोजन व्यवस्थेत शालुताई जेंगठे चंद्रपूर, जगदीश टोमटी परिवार, मीराताई चोपकार, विनायक मुलकलवार परिवार, रसिका पेटकर, अहिल्याबाई गुरनूले देलोडा बुज, सोमेश्वर टेकाम परिवार, पल्लवी निकोडे, दिलीप निकुरे आवळगाव, नामदेवराव वाढई अरसोडा, दर्शना निकुरे हिरापूर, वासुदेव मोहूर्ले तळोधी मो, दुर्वांकुर निकोडे आदींचे मोलाचे सेवाकार्य कामी आले.

    या कार्यक्रमाचे संचलन देवेंद्र पेटकर, प्रास्ताविक रमेश तुनकलवार तर आभार प्रदर्शन कृष्णकुमार निकोडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here