लोकसभा निवडणुक व सण उत्सव, जयंती तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखून साजरे करा—पो.नि. गणेश कराड लोकसभा निवडणूकीत पाश्वभूमीवर तळा शहरात पोलीसांचा रुट मार्च. 

लोकसभा निवडणुक व सण उत्सव, जयंती तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखून साजरे करा---पो.नि. गणेश कराड लोकसभा निवडणूकीत पाश्वभूमीवर तळा शहरात पोलीसांचा रुट मार्च. 

लोकसभा निवडणुक व सण उत्सव, जयंती तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखून साजरे करा—पो.नि. गणेश कराड
लोकसभा निवडणूकीत पाश्वभूमीवर तळा शहरात पोलीसांचा रुट मार्च.

लोकसभा निवडणुक व सण उत्सव, जयंती तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखून साजरे करा---पो.नि. गणेश कराड लोकसभा निवडणूकीत पाश्वभूमीवर तळा शहरात पोलीसांचा रुट मार्च. 

किशोर पितळे:तळा तालुका प्रतिनीधी
९०२८५५८५२९

तळा :- लोकसभेच्या निवडणुका, तसेच सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर तळा पोलिसांच्या वतीने शिस्तबद्ध रुट मार्च ६ एप्रील २४ रोजी काढण्यात आला. तसेच आचारसंहिता कालावधी मध्ये कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिस यंत्रणा सज्ज आहे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून निवडणुका भयमुक्त व संण उत्सव जयंती साजऱ्या करावे  असे आवाहन तळा पोलिस निरीक्षक गणेश कराड यांनी केले आहे. तळा पोलीस ठाणे हद्दीत आगामी येणारे रमजान ईद, गुढीपाडवा,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती जत्रा सण-उत्सव तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक२०२४चे अनुषंगाने मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सो माणगाव श्री सुर्यवंशी सो.यांचे मार्गर्शना खाली तसेच निवडणूका शांततेच्या वातावरणात पार पडाव्यात आणि मतदारांमध्ये विश्‍वासार्हता वाढीस लागावी अशी माहिती रुट मार्च दरम्यान पोलिसांनी दिली.आगामी लोकसभानिवडणुकीच्या अनुषंगाने  पोलीस उपविभागीय अधिकारी माणगांव श्री सुर्यवंशी सो.यांचे मार्गर्शना खाली तळा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीसठाण्यापासून मांदाड फाटा,बाजारपेठ बळीचानाका, बाजार पेठ तळा असा रुट मार्च काढुन बळीचा नाका तळा येथे दंगा काबु/ रंगीत तालीम घेण्यात आली.मोदी नाका ते मेटमोहल्ला,भोईरवाडी, शहरातून वरचा मोहल्ला,नगरपंचायत मार्गे बाजारपेठ असे सायं ४ते ७वाजण्याच्या दरम्यान रुट मार्च चे आयोजन करण्यात आले सदर दंगा काबू योजना करिता तळा पोलीस ठाणे कडील ०१ पो. अधिकारी १२ पो.अंमलदार  व माणगांव आर.सी.पी प्लाटूनचे ३४ जवान हजर होते.