समाजसेवक लिलाधर रिकामे यांना मातृशोक
✍️संतोष उध्दरकर.✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा:- श्रीवर्धन तालुका सायगाव गावाचे माजी सरपंच, समाजसेवक तथा रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक श्रीवर्धन शाखा व्यवस्थापक लिलाधर रिकामे यांच्या मातोश्री राधिका गोविंद रिकामे यांचे दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी वृध्दापकालाने राहत्या घरी दुःखद निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय ९५ वर्षे होते.त्यांचे पश्चात दोन मुलगे,तीन मुली,सुना,जावई,नातवंडे,पतवंडे आणि आप्तेष्ट परिवार आहे.मयत मातोश्री राधिका रिकामे ह्या प्रेमळ मनमिळावू अशा स्वभावाचे व्यक्तिमत्व होते.शेतकरी कुटुंबातील असुनही मेहनत करून त्यांनी मुलांना उच्चशिक्षित,संस्कारीत करून त्यांना सामाजिक सेवेची आवड निर्माण केली.त्यांच्या निधनाने वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली.